Pune District : स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी वाचन उपयुक्त

मंचर : जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी वाचन अत्यंत उपयुक्त आहे,असे विचार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सोपानराव हुले यांनी व्यक्त केले. आंबेगाव तालुक्यातील नारोडी येथील श्री मुक्तादेवी विद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच मंगल हुले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी स्कूल कमिटी सदस्य नवनाथ हुले, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सुभाष हुले, सोपानराव हुले, शाळा व्यवस्थापन समितीचे सखी सावित्री मंच अध्यक्ष गणपत भवारी, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठलराव पिंगळे, बाबुराव पिंगळे, वैभव हुले, दीपक हुले, सोहेल हवलदार इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास साळी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सोपानराव हुले यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले.
ग्रंथ प्रदर्शनासाठी ग्रंथपाल प्रवीण कानडे यांनी अतिशय व्यवस्थितरित्या पुस्तकांची मांडणी केली होती.या कार्यक्रमाच्या आयोजन विद्यालयातील शिक्षक विठ्ठल काठे, दत्तात्रय भोर, प्रमोद चपटे, सुभाष गुंजाळ, सुनील कचरे, महेंद्र गायकवाड, वैशाली भामे, नंदा शिंगाडे, मनिषा तांबे यांनी केले. भगवान भोर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. दत्तात्रय भोर यांनी आभार मानले.





