Vidhan Sabha Elections 2024 : “प्रत्येक मतदारसंघात पंधरा कोटी पोहोचले”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Vidhan Sabha Elections 2024 – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मंगळवारी घोषणा झाली. मात्र या घोषणेच्या आधीच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. महायुती सरकार आमदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
सत्ताधारी पक्षाच्या वतीने काल रात्रीपर्यंत आमदारांना पैशाचे वाटप केले गेले. त्यामुळे आता महाराष्ट्रातील निवडणुका एका टप्प्यात व्हायला हरकत नाही, सगळ्यांना पैसे पोहोचले आहेत, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
ही माहिती मी निवडणूक आयोगाला देत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. मात्र निवडणूक आयोगाला पत्र लिहूनही काही फायदा होईल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
अमोल कीर्तीकर यांच्या बाबतीमध्ये आपण निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. न्यायालयात देखील गेलो होतो. पुरावे देखील दिले, मात्र, त्याचे काहीही झाले नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.





