RCB W vs UPW W : ‘स्मृती-ग्रेस’ वादळात यूपी वॉरियर्स भस्म! आरसीबीचा ९ विकेट्सनी दणदणीत विजय

RCB W vs UPW W Royal Challengers Bengaluru win : महिला प्रीमियर लीग २०२६ च्या पाचव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने आपला दबदबा कायम राखत यूपी वॉरियर्सचा ९ गडी राखून धुव्वा उडवला. यूपीने दिलेल्या १४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीच्या फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेत हा सामना एकतर्फी जिंकला. या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत आपली स्थिती अधिक मजबूत केली आहे.
ग्रेस हॅरिसचा धमाका: एकाच षटकात ३२ धावा!
आरसीबीच्या डावातील ६ वे षटक या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरले. यूपीची गोलंदाज डिएंड्रा डॉटीन गोलंदाजीला आली असता, ग्रेस हॅरिसने तिचा अक्षरशः पालापाचोळा केला. या षटकाचा थरार असा होता:
- पहिला चेंडू: नो-बॉल, ज्यावर ग्रेसने चौकार मारला.
- फ्री-हिट: पुन्हा चौकार.
- पुढील चेंडू: सलग चौकार, षटकार, चौकार आणि चौकार. अशा प्रकारे ग्रेस हॅरिसने एकाच षटकात ३२ धावा वसूल करत डब्लूपीएलमधील सर्वात महागड्या षटकांच्या विक्रमाची बरोबरी केली.
स्मृती मानधना आणि ग्रेस हॅरिस या जोडीने सुरुवातीपासूनच यूपीच्या गोलंदाजांना स्थिरावण्याची संधी दिली नाही.
A blistering knock from Grace Harris makes her tonight’s Player of the Match 😎
Scorecard ▶️ https://t.co/U1cgf01ys0 #TATAWPL | #KhelEmotionKa | #RCBvUPW pic.twitter.com/Bdvs3xb6pQ
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 12, 2026
यूपी वॉरियर्सची संथ सुरुवात –
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना यूपी वॉरियर्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. मेग लॅनिंग (१४), हरलीन देओल (११) आणि फिबी लिचफिल्ड (२०) यांसारख्या स्टार खेळाडूंना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. आरसीबीच्या शिस्तबद्ध माऱ्यामुळे यूपीची अवस्था बिकट झाली होती. मात्र, तळाला दीप्ती शर्माने (नाबाद ४५) आणि डिएंड्रा डॉटीनने (नाबाद ४०) केलेल्या फटकेबाजीमुळे यूपीला ५ बाद १४३ धावांपर्यंत मजल मारता आली.
हेही वाचा – Devdutt Padikkal Record : देवदत्त पडिक्कलने रचला इतिहास! ‘असा’ पराक्रम करणारा भारताचा पहिलाच फलंदाज
आरसीबीचा एकतर्फी विजय –
Dominant! ❤️@RCBTweets go 🔝 of the #TATAWPL 2026 points table with a clinical 9⃣-wicket victory 👏
Scorecard ▶️ https://t.co/U1cgf01ys0 #KhelEmotionKa | #RCBvUPW pic.twitter.com/kjOFG7pjiJ
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 12, 2026
१४४ धावांचे लक्ष्य आरसीबीच्या ताकदवान फलंदाजीसमोर किरकोळ ठरले. स्मृती मानधना (४७*) आणि ग्रेस हॅरिस (८५) यांनी झंझावाती फलंदाजी करत पॉवरप्लेमध्येच सामन्याचा निकाल स्पष्ट केला होता. आरसीबीने केवळ एक गडी गमावून १२.१ षटकांत हे लक्ष्य सहज पार केले आणि चाहत्यांना विजयाची मोठी भेट दिली.





