RCB vs SRH : चिन्नास्वामीवर कोणाचं पारडं जड? पाहा ‘हेड-टू-हेड’ आकडेवारी; शेवटच्या सामन्यात कोणी मारली होती बाजी?
RCB vs SRH : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील या 'हाय-व्होल्टेज' सामन्यापूर्वी दोन्ही संघांतील आकडेवारीचा थरार समोर आला आहे.

RCB vs SRH Head to Head Record ahead IPL 2026 : आयपीएलच्या १९ व्या हंगामाचा बिगुल वाजला असून पहिल्याच सामन्यात यजमान आरसीबीचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. दोन्ही संघांकडे मॅचविनर खेळाडूंची फौज असल्याने हा सामना चुरशीचा होईल, अशी चाहत्यांना खात्री आहे. मात्र, ऐतिहासिक आकडेवारी पाहिली तर हैदराबादने आरसीबीवर किंचित आघाडी घेतल्याचे दिसते.
हेड-टू-हेड रेकॉर्ड: हैदराबादचा वरचष्मा –
आयपीएलच्या इतिहासात आरसीबी आणि हैदराबाद हे संघ आतापर्यंत २५ वेळा आमने-सामने आले आहेत. यापैकी १३ सामन्यांत हैदराबादने बाजी मारली आहे, तर ११ सामने बंगळुरूने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला होता. मात्र, चिन्नास्वामी स्टेडियमवर चित्र वेगळे आहे. या मैदानावर झालेल्या ९ सामन्यांपैकी आरसीबीने ५ वेळा विजय मिळवला आहे, तर हैदराबादला केवळ ३ वेळाच यश मिळाले आहे. RCB vs SRH

आरसीबी विरुद्ध एसआरएच यांच्यातील रेकॉर्ड (RCB vs SRH)
गेल्या सामन्याची आठवण: इशान किशनचा धुमाकूळ RCB vs SRH
Fresh challenges 💪
Two quality sides 👌
Same winning mentality 🫡🎥 Hear from the two Head Coaches as they share key insights ahead of the #RCBvSRH season opener ❤️🧡#TATAIPL | #KhelBindaas | @RCBTweets | @SunRisers pic.twitter.com/ZqZyMpcP9e
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2026
२०२५ च्या हंगामात या दोन्ही संघांमधील शेवटची लढत अतिशय रोमांचक झाली होती. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना इशान किशनच्या ९४ धावांच्या (७ चौकार, ५ षटकार) तुफानी खेळीच्या जोरावर २३१ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात आरसीबीने कडवी झुंज दिली, मात्र त्यांना १८९ धावांपर्यंतच मजल मारता आली.
फिल सॉल्ट (६२) आणि विराट कोहली (४३) यांनी प्रयत्न केले, पण मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशामुळे आरसीबीला पराभव स्वीकारावा लागला होता. आता घरच्या मैदानाचा फायदा घेत आरसीबी गेल्या पराभवाचा बदला घेणार की हैदराबाद पुन्हा एकदा वर्चस्व राखणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.





