Mahendra Singh Dhoni : आयपीएल 2026 च्या नव्या पर्वाला आजपासून (28 मार्च) सुरुवात होणार आहे. अशातच एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनीला दुखापत झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Mahendra Singh Dhoni चेन्नई सुपर किंग्सने धोनीच्या दुखापतीबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. धोनी सध्या उपचाराच्या प्रक्रियेतून जात असून, डॉक्टरांनी त्याला किमान 15 दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे, असे निवेदनात सांगण्यात आले आहे. “एमएस धोनी सध्या काफ स्ट्रेनसाठी रिहॅबमध्ये आहे. परिणामी, तो टाटा आयपीएल 2026 च्या पहिल्या दोन आठवड्यांना मुकण्याची शक्यता आहे. धोनी सुरुवातीचे किमान 4 सामने खेळू शकणार नाही. यामध्ये 30 मार्च: विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR), 3 एप्रिल: विरुद्ध पंजाब किंग्स (PBKS), 5 एप्रिल: विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि 11 एप्रिल: विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC)” असे निवेदनात म्हटले आहे. Mahendra Singh Dhoni Official Statement MS Dhoni is currently undergoing rehabilitation for a calf strain. As a result, he is likely to miss the first two weeks of TATA IPL 2026. Get well soon, Thala! 💛🦁 pic.twitter.com/4dgmt5EWFi — Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 28, 2026 धोनी 44 वर्षांचा आहे आणि हे त्याचे शेवटचे आयपीएल असू शकते, असे बोलले जात आहे. धोनीला लवकरात लवकर बरे व्हावे, अशी सर्व क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे. अशा परिस्थितीत हंगामाच्या सुरुवातीलाच त्याला झालेली दुखापत चाहत्यांची चिंता वाढवणारी आहे. धोनीच्या अनुपस्थितीत ‘सीएसके’चा नवा स्टार खेळाडू संजू सॅमसन किंवा उर्वील पटेल यांच्याकडे विकेटकीपिंगची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. Mahendra Singh Dhoni आज पहिला सामना Mahendra Singh Dhoni आयपीएल 2026 च्या 19 व्या हंगामातील पहिला सामना गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. हेही वाचा : Sanjay Raut : भोंदू अशोक खरातांकडे जाणारे ‘ते’ 40 आमदार कोण? संजय राऊतांच्या सवालाने खळबळ