RCB vs PBKS Shreyas Iyer praises Yuzvendra Chahal : आयपीएल २०२५ चा ३४ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला. पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यातील षटकांची संख्या १४-१४ षटकांपर्यंत कमी करण्यात आली. ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळुरूने ९ विकेट्स गमावून ९५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाबने १२.१ षटकांत विजय मिळवला. विजयानंतर कर्णधार श्रेयसने पंजाबच्या एका खास गोलंदाजाचे कौतुक केले.
श्रेयस अय्यरने या गोलंदाजाचे केले कौतुक –
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध घातक गोलंदाजी केल्यानंतर, फिरकीपटू युझवेंद्र चहलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आपला उत्कृष्ट फॉर्म सुरू ठेवला. बंगळुरूविरुद्धच्या तीन षटकांच्या स्पेलमध्ये चहलने ११ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या. आता फिरकीपटू चहलच्या या उत्कृष्ट कामगिरीचे कर्णधार श्रेयस अय्यरने तोंडभरून कौतुक करताना मोठं वक्तव्य केलं.
तो आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक – श्रेयस अय्यर
Shreyas Iyer talking about the Chahal:
“I personally had a chat with him & told him that you are match winner and you need to get us as many wickets as possible and you don’t need to be safe – he has a capability of bouncing back and he is one of the best bowlers in IPL”. pic.twitter.com/2jxoDr0t3X
— Johns. (@CricCrazyJohns) April 18, 2025
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हरवल्यानंतर अय्यरने चहलचे कौतुक केले. तो म्हणाला, “मी वैयक्तिकरित्या त्याच्याशी बोललो आणि त्याला सांगितले की तू एक मॅचविनर खेळाडू आहेस. त्यामुळे तुला आपल्यासाठी शक्य तितके विकेट्स घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तुला बचावात्मक गोलंदाजी करण्याची गरज आहे. त्याच्याकडे पुनरागमन करण्याची क्षमता आहे आणि तो आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे.”
हेही वाचा – RR vs LSG : राजस्थान रॉयल्सच्या कर्णधार-प्रशिक्षकात वाद? राहुल द्रविडने दिले स्पष्ट उत्तर, पाहा VIDEO
विशेष म्हणजे पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात, बंगळुरूने टिम डेव्हिडच्या स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित षटकांत ९ गडी गमावून ९५ धावा केल्या होत्या. पंजाबकडून अर्शदीप सिंग, मार्को जानसेन, युझवेंद्र चहल आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात, पंजाब किंग्जने १२.१ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले. यादरम्यान, बंगळुरूकडून जोश हेझलवूडने ३ आणि भुवनेश्वर कुमारने २ विकेट्स घेतल्या.