IPL 2025 Final : अखेर १८ वर्षांनी किंग कोहलीचं स्वप्न साकार! आरसीबीने पंजाबचा धुव्वा उडवत पटकावलं पहिलं जेतेपद

IPL 2025 Final RCB win IPL title after 18 years : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची १८ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. गेल्या १८ वर्षांपासून अनेकदा पराभव आणि थट्टेचा सामना करणाऱ्या आरसीबीने अखेर पहिल्यांदाच आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील संघाने रोमांचक फायनल सामन्यात पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव केला. यासह, आरसीबीने आयपीएल २०२५ च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. कृणाल पंड्या, यश दयाल आणि भुवनेश्वर कुमार यांच्या संस्मरणीय गोलंदाजीच्या बळावर आरसीबीने १९० धावांचा यशस्वीरित्या बचाव केला. यासह, संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न साकार झालं.
अखेर १७ वर्षांनी कोहलीसह आरसीबीचं स्वप्न साकार –
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मंगळवार, ३ जून रोजी खेळलेल्या या अंतिम सामन्याकडे सर्वांचे डोळे लागले होते की, यावेळी विराट कोहली आपल्या नावापुढे आयपीएल विजेता हा किताब लिहू शकेल की नाही. यामागे कारणही तसेच होते. हंगाम सुरू होण्यापूर्वीच वारंवार चर्चा होत होती की, १८व्या हंगामात १८ क्रमांकाची जर्सी परिधान करणाऱ्या विराटसाठी कदाचित हाच सर्वोत्तम वर्ष असेल. कदाचित नशीब त्याच्यासाठी याच संधीची वाट पाहत असावं. अगदी महाभारताचा १८व्या दिवशी संपल्याचा उल्लेखही त्याच्या चाहत्यांनी करायला सुरुवात केली होती. अखेर हे सारे योगायोग कोहली आणि आरसीबीसाठी सुखद ठरले.
𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒 𝐎𝐅 #𝐓𝐀𝐓𝐀𝐈𝐏𝐋 𝟐𝟎𝟐𝟓 🏆🤩
The ROYAL CHALLENGERS BENGALURU have done it for the first time ❤#RCBvPBKS | #Final | #TheLastMile | @RCBTweets pic.twitter.com/x4rGdcNavS
— IndianPremierLeague (@IPL) June 3, 2025
कृणाल- भुवनेश्वरच्या गोलंदाजीने बजावली महत्त्वाची भूमिका –
AAAAARRRRR CEEEEEEE BEEEEEE ❤🏆#TATAIPL | #RCBvPBKS | #Final | #TheLastMile | @RCBTweets pic.twitter.com/lp3AwgCVQl
— IndianPremierLeague (@IPL) June 3, 2025
पंजाब किंग्सचा संघ फायनल सामन्यात १९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरला, तेव्हा त्यांच्या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. मात्र, ४३ धावांवर त्यांना पहिला धक्का प्रियांस आर्याच्या (२४) रुपाने बसला. त्यानंतर प्रभसिमरन सिंग आणि जोश इंग्लिश यांनी डाव सांभाळला आणि स्कोअर ७२ धावांपर्यंत नेला. कृणाल पंड्याने प्रभसिमरनला बाद करत सामन्यात आरसीबीचे पुनरागमन केले. येथून पंजाब किंग्सला सामन्यात परत येण्याची संधीच दिली नाही.
हेही वाचा –RCB vs PBKS Final : किंग कोहलीचा फायनलमध्ये विक्रमांचा धमाका; पोलार्ड-रोहितला टाकले मागे!
श्रेयस अय्यर, ज्याच्याकडून या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा होती, तो केवळ एक धाव काढून बाद झाला. या सामन्यात कृणाल पंड्याने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत केवळ १७ धावा देत २ विकेट्स घेतले, ज्यामुळे सामन्यात निर्णायक फरक पडला. आरसीबीसाठी क्रुणाल व्यतिरिक्त भुवनेश्वर कुमारनेही २ विकेट्स घेतल्या, जो आपल्या कारकिर्दीत प्रथमच टी-२० फायनल सामन्यात विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला.
हेही वाचा – IPL 2025 Final : जितेशचा जादुई स्कूपने वेधलं लक्ष ; फायनल सामन्यात ठोकला जबरदस्त षटकार! पाहा VIDEO
विराटने साकारली ४३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी –
Virat Kohli carried the weight of a dream for 1️⃣8️⃣ years…
Tonight, he finally lets it go with a trophy in hand ❤🏆#TATAIPL | #RCBvPBKS | #Final | #TheLastMile | @imVkohli pic.twitter.com/2wfGHDcqAh
— IndianPremierLeague (@IPL) June 3, 2025





