RCB vs PBKS Final : आरसीबीची तुफान सुरुवात, आयपीएल फायनलमध्ये रचला नवा इतिहास!

RCB vs PBKS Final RCB Sets IPL New Record : आयपीएल २०२५ चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर, विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी आरसीबी डावाची सुरुवात करताना पहिल्याच षटकात नवा इतिहास रचला.
खरंतर, पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंग पहिले षटक टाकण्यासाठी आला होता. त्याने पहिलाच चेंडू वाईड टाकला. त्यानंतर फिल सॉल्टने २ डॉट बॉल खेळले आणि नंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार मारला. पुढच्या चेंडूवर २ धावा आल्या आणि त्यानंतर त्याने पाचव्या षटकार मारला. शेवटच्या चेंडूवर एकही धाव आली नाही. अशाप्रकारे, आरसीबी संघाने पहिल्या षटकात १३ धावा करून एक नवा विक्रम रचला.
सीएसकेचा विक्रम केला उद्धवस्त –
An eventful start 🔥
A buzzing atmosphere 🤩GAME ON in the Grand Final! 👊
Updates ▶ https://t.co/U5zvVhcvdo#TATAIPL | #RCBvPBKS | #Final | #TheLastMile pic.twitter.com/xlQF1euGIw
— IndianPremierLeague (@IPL) June 3, 2025
आरसीबी संघ आयपीएल फायनलच्या पहिल्या षटकात सर्वाधिक धावा करणारा संघ बनला आहे. आरसीबीने ५ वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा विक्रम मोडला. यापूर्वी, चेन्नईने आयपीएल २०२३ च्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या फायनल सामन्यात पहिल्या षटकात १० धावा केल्या होत्या. त्या सामन्यात चेन्नईने गुजरातला हरवून ५व्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले होते.
हेही वाचा – IPL 2025 Final : आरसीबी-पंजाब सामन्यात ख्रिस गेलने वेधलं लक्ष, खास पोशाखात दमदार एन्ट्री!
आयपीएलच्या फायनल सामन्यात पहिल्या षटकात सर्वाधिक धावा करणारे संघ:
- १३/० – आरसीबी विरुद्ध पीबीकेएस, अहमदाबाद, २०२५*
- १०/० – सीएसके विरुद्ध जीटी, अहमदाबाद, २०२३
- १०/१ – केकेआर विरुद्ध पीबीकेएस, बेंगळुरू, २०१४





