IPL 2025 Final : आरसीबी-पंजाब सामन्यात ख्रिस गेलने वेधलं लक्ष, खास पोशाखात दमदार एन्ट्री!

IPL 2025 Final Chris Gayle supporting both RCB and PBKS : वेस्ट इंडिजचा अनुभवी खेळाडू ख्रिस गेल मंगळवारी गुजरातमधील अहमदाबाद येथे पोहोचला. तो आयपीएल २०२५ चा अंतिम सामना पाहण्यासाठी आला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात हा सामना खेळला जात आहे. या जेतेपदाच्या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सामन्यात ख्रिस गेलने सर्वांचे लक्ष वेधलं आहे.
कारण तो कोणाला सपोर्ट करायला आला आहे? याबद्दल चाहते चिंतेत आहेत. दोन्ही संघ पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद जिंकण्यासाठी मैदानात उतरले आहेत. गेलने यापूर्वी आरसीबी आणि पंजाब या दोन्ही संघांकडून खेळला आहे. त्यामुळे हा अंतिम सामना पाहण्यासाठी त्याचे आगमन खास आहे. त्याच वेळी, गेल या सामन्यात एका अनोख्या शैलीत दिसला आहे. त्याने आज परिधान केलेल्या पोशाखाने दोन्ही संघांच्याही चाहत्यांनाही गोंधळाता टाकले आहे.
CHRIS GAYLE SUPPORTING RCB & PBKS IN IPL FINAL. 👌 pic.twitter.com/62PCM4vU3K
— Johns. (@CricCrazyJohns) June 3, 2025
ख्रिस गेलने आपल्या पोशाखाने वेधलं सर्वांच लक्ष –
ख्रिस गेल हा क्रिकेट जगतातील एक मोठा खेळाडू आहे. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम परदेशी फलंदाजांपैकी एक आहे. त्याचे जुने संघ आरसीबी आणि पंजाब किंग्ज आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीत खेळत आहेत. त्यामुळे गेलने एका खास प्रकारचा पोशाख घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आरसीबी जर्सी आणि पंजाब किंग्जवरील प्रेम दर्शविणारी लाल पगडी आहे परिधान केली आहे.
हेही वाचा – IPL 2025 Final : पंजाबने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
ख्रिस गेलने आयपीएलमध्ये तीन संघांकडून खेळला आहे. आरसीबी आणि पंजाब किंग्ज, हे दोन्ही संघ आयपीएल २०२५ चा अंतिम सामना खेळत आहेत. गेल हा वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे. त्याने आरसीबीमध्ये खूप प्रसिद्धी मिळवली आहे. ख्रिस गेल सामन्यापूर्वी म्हणाला की, तो दोन्ही संघांना सपोर्ट करायला आला आहे. म्हणूनच त्याने आरसीबीची जर्सी आणि पंजाब किंग्जची पगडी घालण्याचा निर्णय घेतला आहे.





