RCB vs GT : “कौण है ये लोग और कहां से आते है…”, विराटला आऊट केल्यानंतर अर्शद खान ऐवजी अर्शद वारसी ट्रोल

RCB vs GT Why did Arshad Warsi get abused when Virat Kohli got out : विराट कोहलीची गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते आणि त्याचे चाहते जगभरात आहेत. आयपीएल २०२५ मध्ये, गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात तो मोठी खेळी खेळू शकला नाही आणि ६ चेंडूत फक्त ७ धावा करून बाद झाला. त्याने त्याच्या डावात एक चौकारही मारला. कोहलीची विकेट २७ वर्षीय गोलंदाज अर्शद खानने घेतली. यानंतर लगेचच चाहत्यांनी सोशल मीडियावर अभिनेता अर्शद वारसीवर टीका आणि ट्रोल करायला सुरुवात केली, याच कारण काय आहे? जाणून घेऊया.
चाहत्यांच्या रडारवर का आला अभिनेता अर्शद वारसी?
खरंतर, विराट कोहलीला बाद करणाऱ्या गोलंदाजाचे नाव अर्शद खान होते, पण काही चाहत्यांनी त्याच्याऐवजी अभिनेता अर्शद खानच्या पोस्टवर कमेंट्स करायला सुरुवात केली. अर्शद वारसीने पाच दिवसांपूर्वी अजय देवगण सोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यावर विराट कोहलीच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. काही काळानंतर, अर्शद वारसी सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला आणि मग मजा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि मीम्सही व्हायरल होऊ लागल्या.
View this post on Instagram
चाहत्यांच्या काय-काय आल्या प्रतिक्रिया?
एका युजर्सनी लिहिले आहे की, ‘कोहलीला आऊट का केले?’ तसेच अल्ट्राएज नावाच्या एका युजर्सनी लिहिले, ‘ये सर्किट, तू कोहलीला का आऊट केलेस?’
Koi Bat nhi Arshad Warsi toh hai na..#RCBvsGT https://t.co/w9lMPuw2N8 pic.twitter.com/kqo8xNT9hT
— daalbatiSOORMA (@monnuuu___) April 2, 2025
आणखी एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच तू एक उत्तम गोलंदाजही आहेस.’
*virat gets out but the bowler who took kohli's wicket is not on insta*
rcb fans: pic.twitter.com/jpa2Wo8XSk
— ex. capt (@thephukdi) April 2, 2025
त्याच वेळी, अनेक चाहत्यांना माहित होते की, तो गोलंदाज अर्शद खान नाही तर अभिनेता अर्शद वारसी आहे. तर एका युजरने लिहिले आहे की, ‘माफ करा अर्शद भाई’. सुकुन नावाच्या एका युजर्सने लिहिले की, ‘हे लोक कोण आहेत आणि ते कुठून आले आहेत.’
हेही वाचा – RCB vs GT : गुजरात टायटन्सचा सलग दुसरा विजय, सिराज-बटलरच्या जोरावर आरसीबीचा उडवला धुव्वा
या सामन्याबद्दल बोलायचे, तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १६९ धावा केल्या. संघाकडून लियाम लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक ५४ धावा केल्या. त्याच्याशिवाय जितेश शर्माने ३३ धावांचे योगदान दिले. या खेळाडूंमुळेच आरसीबी संघ सन्मानजनक धावसंख्या गाठू शकला. यानंतर, गुजरातकडून साई सुदर्शन आणि जोस बटलर यांनी चांगली फलंदाजी केली. सुदर्शनने ४९ धावा आणि बटलरने ७३ धावा करत गुजरात संघाला ८ विकेट्सने विजय मिळवून दिला.





