RCB vs GT : विराट कोहलीला बाद करणारा अर्शद खान कोण आहे? जाणून घ्या

RCB vs GT Who is Arshad Khan : अर्शद खान हे नाव फार कमी चाहत्यांना माहिती असेल पण या गोलंदाजाने चिन्नास्वामी स्टेडियमवर विराट कोहलीची विकेट घेऊन आपली प्रतिभा दाखवून दिली. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शद खान गुजरात टायटन्सकडून खेळत आहे, त्याला १ कोटी ३० लाख रुपयांना खरेदी करण्यात आले होते आणि या खेळाडूने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला फक्त ७ धावांवर बाद केले. अर्शद खानने विराटला शॉर्ट ऑफ पिच बॉल टाकला जो तो नियंत्रित करू शकला नाही आणि प्रसिद्ध कृष्णाने डीप फाइन लेगवर त्याचा झेल घेतला. आता किंग कोहलीला तंबूचा रस्ता दाखवणारा अर्शद खान कोण आहे? जाणून घेऊया.
कोण आहे अर्शद खान?
अर्शद खानचा जन्म मध्य प्रदेशातील सिवनी येथे झाला. या खेळाडूचे वडील असफाक स्वतः क्रिकेट प्रशिक्षक आहेत आणि त्यांनीच त्यांच्या मुलाची प्रतिभा ओळखली. जेव्हा अर्शद ९ वर्षांचा होता, तेव्हा तो त्याच्यापेक्षा मोठ्या मुलांसोबत खेळायचा आणि त्यांच्याविरुद्ध तो लांब षटकार मारायचा. त्याचे शॉट्स पाहिल्यानंतर त्याच्या वडिलांनी ठरवले की ते अर्शद खानला क्रिकेटर बनवतील. अर्शद खानला त्याच्या वडिलांनी अब्दुल कलाम यांच्या प्रशिक्षणासाठी नेले होते.
Back into the lineup with a BANG! 🔥 pic.twitter.com/eqHRJM9vZn
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 2, 2025
त्यावेळी क्रिकेट ट्रायल्स सुरू होत्या. अर्शदने वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी १४ वर्षांखालील संघात स्थान मिळवले. अर्शदने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात फलंदाज म्हणून केली होती पण होशंगाबादविरुद्धच्या सामन्यात त्याला गोलंदाजीची जबाबदारी देण्यात आली, जिथे त्याने त्याच्या डाव्या हाताच्या वेगाने सर्वांना प्रभावित केले. त्याच्या वेगासोबतच त्याने चेंडू दोन्ही दिशेने वळवण्याची क्षमताही दाखवली. याशिवाय अर्शद खानही चांगली फलंदाजी करायचा.
हेही वाचा – Abrar Ahmed : ‘शुबमन गिलला काय इशारा करत होतास?’, भारतीय चाहतीने अबरार अहमदला डिवचले, पाहा VIDEO
वडिलांचा पगार शिपायापेक्षा कमी –
अर्शद खानचे वडील अशफाक खान महिन्याला फक्त १५ हजार रुपये कमवत होते, पण त्यांनी त्यांच्या मुलाला १६ हजार रुपयांचा किट घेऊन दिले. अर्शदची आई आलियाने स्वतः हे सांगितले. २०२२ मध्ये, अर्शद खानचे नशीब आयपीएलमध्ये चमकले. जेव्हा त्याला मुंबई इंडियन्सने २० लाख रुपयांना विकत घेतले होते, परंतु दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला. यामुळे अर्शद अत्यंत निराश झाला आणि तो सिवनीला परतला आणि मुलांना मोफत क्रिकेट शिकवू लागला.तंदुरुस्त झाल्यानंतर, अर्शद खान सिवनीहून जबलपूरला गेला आणि तिथे अनेक सामने खेळले.
हेही वाचा – RCB vs GT : सॉल्टने स्टेडियमच्या बाहेर षटकार मारल्यानंतर; सिराजने ‘असा’ घेतला बदला, VIDEO होतोय व्हायरल
सामने खेळण्यासाठी ३०० किमीचा प्रवास करावा लागायचा –
तो सामने खेळायला जाण्यासाठी बहुतेकदा ३०० किमीचा प्रवास करायचा. अखेर त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि या खेळाडूला २०२३ मध्ये आरसीबीविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यावेळी अर्शद मुंबई इंडियन्सचा भाग होता. अर्शद खान आयपीएलमध्ये तीन संघांकडून खेळला आहे. मुंबई इंडियन्सनंतर तो लखनौ सुपरजायंट्सकडून खेळला आणि आता तो गुजरात संघात आहे. त्याला आयपीएलमध्ये १२ सामने खेळण्याची संधी मिळाली आणि तो ७ विकेट्स घेण्यात यशस्वी झाला. मोठी गोष्ट म्हणजे अर्शदला फलंदाजी देखील करता येते, त्याच्या नावावर एक अर्धशतक आहे आणि त्याचा स्ट्राइक रेट १४० च्या वर आहे.





