Royal Challengers Bengaluru : RCB चा आगामी हंगामासाठी मेगा प्लॅन! नवीन कोच नियुक्त करत ‘या’ ४ स्टार खेळाडूंना केले रिटेन

Royal Challengers Bengaluru Updates : महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) च्या २०२६ च्या चौथ्या हंगामासाठी जोरदार तयारी सुरू आहे. हंगामापूर्वी मेगा प्लेयर लिलाव होणार असून, त्याआधी ५ नोव्हेंबर रोजी पाचही फ्रेंचायझींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू (आरसीबी) महिला संघाने चार महत्त्वाच्या खेळाडूंना कायम ठेवले आहे. यात कर्णधार स्मृती मानधना, एलिस पेरी, ऋचा घोष आणि श्रेयंका पाटील यांचा समावेश आहे. त्याचबरोबर फ्रेंचायझीने आगामी हंगामासाठी नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे.
मालोलन रंगराजन आरसीबीचे नवे मुख्य प्रशिक्षक
आरसीबी फ्रेंचायझीने आगामी हंगामासाठी नवीन मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी मालोलन रंगराजन यांच्याकडे सोपवली आहे, जे गेल्या सहा वर्षांपासून आरसीबी फ्रेंचायझीच्या सहाय्यक स्टाफचा भाग आहेत. मालोलन आता ल्यूक विलियम्स यांची जागा घेतील, ज्यांनी इतर प्रशिक्षण जबाबदाऱ्यांमुळे पद सोडण्याचा निर्णय घेतला होता. मालोलन रंगराजन यांनी आतापर्यंत आरसीबी महिला संघात स्काउटिंग प्रमुख म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
🚨 OFFICIAL ANNOUNCEMENT
Malolan Rangarajan, a key member of the RCB support staff for the last 6 years in various roles, has now been appointed as 𝗛𝗘𝗔𝗗 𝗖𝗢𝗔𝗖𝗛 for the upcoming WPL cycle.
More details, and WPL retentions announcement soon… 🤩#PlayBold #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/PLiDY9sxef
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) November 6, 2025
तसेच, डब्ल्यूपीएल २०२५ हंगामात त्यांनी संघाचे सहायक प्रशिक्षक म्हणूनही काम केले होते. रंगराजन यांचा क्रिकेट कारकीर्दही उल्लेखनीय आहे; त्यांनी ४७ प्रथम श्रेणी सामन्यांत १३६ बळी घेतले आणि १३७९ धावा केल्या. कारकीर्दीत त्यांनी तमिळनाडू, उत्तराखंड आणि दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या अनुभव आणि रणनीती समजुतीमुळे आरसीबी महिला संघाला आगामी हंगामात मजबुती मिळेल अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा – 1xBet Betting Case : रैना-धवन यांची ११ कोटींची मालमत्ता जप्त; 1xBet सट्टेबाजी प्रकरणात ईडीची मोठी कारवाई!
आन्या श्रुबसोल प्रशिक्षक पॅनेलमध्ये सामील –
🎬 𝐒𝐞𝐚𝐬𝐨𝐧 𝟒, 𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 𝟏: The making of our #ClassOf2026💪
Our #PlayBold core, our beating heart. 🤩❤️#ನಮ್ಮRCB pic.twitter.com/jhjCGhv6pR
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) November 6, 2025
डब्ल्यूपीएल २०२५ मध्ये आरसीबी महिला संघाचे प्रदर्शन अपेक्षेनुसार नव्हते, त्यानंतर फ्रेंचायझीने प्रशिक्षक स्टाफमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. याच दिशेने संघाने इंग्लंडची माजी विश्वविजेती वेगवान गोलंदाज आन्या श्रुबसोल यांना प्रशिक्षक पॅनेलमध्ये सामील केले आहे. श्रुबसोल यांच्या येण्यामुळे संघाच्या गोलंदाजांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय अनुभवाचा मोठा फायदा होईल. त्या नवीन चेंडूने स्विंग करण्यात निपुण आहेत आणि त्यांची उपस्थिती युवा गोलंदाजांसाठी प्रेरणादायी ठरेल.





