RCB Players Injured ahead IPL 2026 : टी-२० वर्ल्ड कप २०२६ संपल्यानंतर लगेचच जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचा म्हणजेच आयपीएल २०२६ चा (IPL 2026) थरार रंगणार आहे. सर्व १० संघांनी गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावात आपला ताफा तयार केला आहे. मात्र, प्रत्यक्ष मैदानात उतरण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. संघातील चार महत्त्वाच्या खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे आरसीबीला ‘झटक्यावर झटके’ बसत आहेत. या ४ ‘मॅचविनर’ खेळाडूंनी वाढवले टेन्शन – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे हे चारही खेळाडू आपल्या जोरावर सामना फिरवण्याची ताकद ठेवतात. फिल सॉल्ट, रजत पाटीदार, जॉश हेझलवूड आणि टिम डेव्हिड यांच्या दुखापतीमुळे फ्रँचायझीची झोप उडाली आहे. १. फिल सॉल्ट (कंबर दुखापत): इंग्लंडचा स्फोटक सलामीवीर फिल सॉल्ट सध्या ‘आयएलटी20’ लीगमध्ये खेळत होता. मात्र, तिथे त्याला कंबरेची दुखापत (Back Injury) झाली. या दुखापतीमुळे तो क्वालिफायर सामन्यालाही मुकला असून त्याच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हेही वाचा – Mitchell Starc Record : मिचेल स्टार्कचे ऐतिहासिक ‘त्रिशतक’! ‘ही’ कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा तिसराच वेगवान गोलंदाज २. रजत पाटीदार (आरसीबीचा कर्णधार): आरसीबीचा मधल्या फळीतील आधारस्तंभ आणि नवनियुक्त कर्णधार रजत पाटीदार याला ‘विजय हजारे ट्रॉफी’ दरम्यान दुखापत झाली आहे. पाटीदारची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, आयपीएलपूर्वी कर्णधाराला दुखापत होणे आरसीबीसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. ३. टिम डेव्हिड (हॅमस्ट्रिंग इंजरी): ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज टिम डेव्हिड याला बिग बॅश लीगमध्ये (BBL) पर्थ स्कॉचर्सविरुद्धच्या सामन्यात हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. ही दुखापत आरसीबीसह ऑस्ट्रेलियाच्या टी-२० वर्ल्ड कप मोहिमेसाठीही मोठा धक्का मानली जात आहे. ४. जॉश हेझलवूड (पेस अटॅकचा कणा): आरसीबीच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करणारा जॉश हेझलवूड नोव्हेंबर २०२५ पासून सातत्याने दुखापतींशी झुंज देत आहे. याच दुखापतीमुळे तो सध्या सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या ‘ॲशेस’ मालिकेलाही मुकला आहे. आयपीएलपर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त होणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा – Joe Root Record : जो रूटचा ऐतिहासिक पराक्रम! महेला जयवर्धनेला मागे टाकत कसोटीत केला खास विक्रम आरसीबीसमोरील आव्हान – डिसेंबरमधील ऑक्शनमध्ये विचारपूर्वक संघ निवडल्यानंतर आता मुख्य खेळाडूंच्या दुखापतींमुळे संघ संयोजनात अडथळे येऊ शकतात. जर हे खेळाडू आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांपर्यंत तंदुरुस्त झाले नाहीत, तर आरसीबीला त्यांच्या जागी पर्यायी खेळाडूंचा शोध घ्यावा लागेल.