RCB Victory Parade : चिन्नास्वामीबाहेरील दुर्घटनेने आरसीबी हादरली, मृत्यूमुखी पडलेल्या चाहत्यांसाठी व्यक्त केला शोक

RCB Issues Statement on RCB Victory Parade Stampede : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाने आयपीएल २०२५ चे विजेतेपद पटकावल्यानंतर बुधवारी बंगळुरूमध्ये विजय परेड आणि समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे हा आनंदोत्सव शोकांतिकेत बदलला. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला, तर ३३ जण जखमी झाले. या घटनेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अधिकृत निवेदन जारी करून शोक व्यक्त केला आहे.
आरसीबीकडून अधिकृत निवेदन जारी –
आरसीबीने आपल्या निवेदनात म्हटले, “आम्ही बंगळुरूमध्ये आमच्या संघाच्या आगमनाच्या अपेक्षेने जमलेल्या जनसमुदायादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनांमुळे अत्यंत दुखी आहोत. आम्हाला प्रसारमाध्यमांद्वारे या घटनेची माहिती मिळाली. सर्वांची सुरक्षितता आणि कल्याण आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.”
𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗦𝘁𝗮𝘁𝗲𝗺𝗲𝗻𝘁: 𝗥𝗼𝘆𝗮𝗹 𝗖𝗵𝗮𝗹𝗹𝗲𝗻𝗴𝗲𝗿𝘀 𝗕𝗲𝗻𝗴𝗮𝗹𝘂𝗿𝘂
We are deeply anguished by the unfortunate incidents that have come to light through media reports regarding public gatherings all over Bengaluru in anticipation of the team’s arrival this… pic.twitter.com/C0RsCUzKtQ
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) June 4, 2025
मुख्यमंत्र्याकडून ११ जणांच्या मृत्यूची पुष्टी –
या घटनेनंतर आरसीबीने स्थानिक प्रशासनाच्या सल्ल्याचे आणि मार्गदर्शनाचे पालन केले. संघाने विजय परेड रद्द करून कार्यक्रम लवकरात लवकर संपवला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आणि मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. तसेच, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही दिले.
बंगळुरू शहर शोकाकुल –
RCB की जीत का जश्न मनाने के लिए बेंगलुरु में निकाले गए रोड शो के दौरान भारी भीड़ उमड़ पड़ी, जिससे अफरा-तफरी मच गई और भगदड़ जैसी स्थिति बन गई। इस दौरान कई लोग घायल हो गए और कुछ की मौत की भी खबर सामने आई।#chinnaswamistadiumbangalore #stampedeinbangalore #rcb#chinnaswamystadium pic.twitter.com/Wzv3VsLEMV
— KhabarDaari (@khabardaari) June 4, 2025
या दुर्घटनेमुळे बंगळुरू शहर शोकाकुल झाले आहे. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जमलेल्या हजारो चाहत्यांनी आपल्या आवडत्या खेळाडूंना आणि आयपीएल ट्रॉफीला पाहण्यासाठी गर्दी केली होती. परंतु, अपुऱ्या नियोजनामुळे ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हलक्या प्रमाणात बळाचा वापर केला, तरीही अनेक जण जखमी झाले. जखमींना बोवरिंग आणि व्यदेही रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा – RCB Victory Parade : बाहेर लोकांचा मृत्यू, आत आरसीबीचा विजयोत्सव…IPL च्या अध्यक्षांनी उपस्थित केले सवाल
चौकशी होणे आवश्यक – अरुण धूमल
आयपीएलचे अध्यक्ष अरुण धूमल यांनी या घटनेवर दुखः व्यक्त केले आणि म्हणाले, “हा कार्यक्रम बीसीसीआयचा नव्हता. तरीही ही घटना दुखद आहे. याची चौकशी होणे आवश्यक आहे.” आरसीबीच्या चाहत्यांसाठी हा विजय १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळाला असला, तरी ही शोकांतिका कायम स्मरणात राहील.





