RCB Fan : ‘…तर पतीला घटस्फोट देईन’, आरसीबीच्या जेतेपदासाठी महिला चाहतीने संसार लावला पणाला

RCB Fan’s Viral Divorce Threat for IPL 2025 Win : आयपीएल २०२५ मध्ये, आरसीबीने शानदार कामगिरी केली आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आरसीबीच्या चाहत्यांना आशा आहे की यंदा १७ वर्षांपासूनचा ट्रॉफीचा दुष्काळ संपेल. खूप वर्षांपासून चाहत्यांची इच्छा आहे की विराट कोहलीला आरसीबीसाठी आयपीएल ट्रॉफी उचलताना पाहावे. यासाठी चाहते काहीही करायला तयार आहेत. ट्रॉफीसाठी काही चाहते देवाकडे साकडं घालत आहेत. अशात एका चाहतीचा व्हिडीओ आणि पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आयपीएल सुरू होण्यापूर्वी एका महिला चाहतीने इंस्टाग्रामवर घोषणा केली होती की, जर आरसीबीने यावेळी जेतेपद पटकावले नाही, तर ती तिच्या पतीला घटस्फोट देईल. ती म्हणते की ती धमकी देत नाहीये, तसेच हा स्क्रिप्टेड व्हिडिओ नाहीये, पण ती संपूर्ण सत्य सांगत आहे. जर आरसीबीने अंतिम सामना जिंकला नाही तर ती तिच्या पतीला शंभर टक्के घटस्फोट देईल.
View this post on Instagram
आरसीबीच्या जेतेपदासाठी चाहतीने संसार लावला पणाला –
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 29, 2025
सुमारे २ महिन्यांनंतर, तीच महिला आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्जचा क्वालिफायर १ सामना पाहण्यासाठी न्यू चंदीगडला पोहोचली होती आणि तिच्या हातात एक पोस्टर होता, ज्याच्यावर तेच लिहले होते. गुरुवारी मुल्लानपूरमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान, महिलेचा फलक टीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला. मनोरंजक गोष्ट म्हणजे आरसीबीने सामना जिंकला आहे आणि अंतिम फेरीचे तिकीट मिळवले आहे.
‘जर आरसीबीने अंतिम सामना जिंकला नाही तर मी माझ्या पतीला घटस्फोट देईन.’
हेही वाचा – Vaibhav Suryavanshi : पाटण्यात मोदी-वैभव भेट; चमकत्या ताऱ्याला पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा! पाहा VIDEO
आरसीबी संघ फायनलमध्ये दाखल –
लाल साडी परिधान केलेल्या महिलेने सामन्यादरम्यान पिवळा पोस्टर हातात धरला होता. त्यावर लिहिले होते, “जर आरसीबीने अंतिम सामना जिंकला नाही तर मी माझ्या पतीला घटस्फोट देईन.” यावर तिने तिचा इंस्टाग्राम आयडीवर लिहिला होता. तसेच त्यावर किंग कोहली हा हॅशटॅगही लिहिला होता. आता आरसीबीचा संघ फायनलमध्ये पोहोचला असून या महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.





