RCB Fan Demands : ‘जर आरसीबीने ट्रॉफी जिंकली तर…’, चाहत्याने पत्राद्वारे कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याकडे केली ‘ही’ खास मागणी

शिवानंदने आपल्या पत्रात काय लिहिले?
BREAKING 🚨 #RCB fan Shivanand wrote a letter to the Karnataka Chief Minister requesting a public holiday on June 4.
He said he’s confident that RCB will win the #IPL2025 trophy 🏆 on June 3, and everyone should get a day off to celebrate peacefully. pic.twitter.com/dV81HoTJIm
— Movies4u Official (@Movies4u_Officl) May 30, 2025
शिवानंदने आपल्या पत्रात आरसीबीच्या यशाचे महत्त्व आणि चाहत्यांचा उत्साह व्यक्त केला आहे. “आरसीबीने जर आयपीएल २०२५ चे जेतेपद पटकावले, तर हा कर्नाटकातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी अभिमानाचा क्षण असेल. या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, जेणेकरून सर्व चाहते एकत्र येऊन आनंद साजरा करू शकतील,” असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
हेही वाचा – RCB Fan : ‘…तर पतीला घटस्फोट देईन’, आरसीबीच्या जेतेपदासाठी महिला चाहतीने संसार लावला पणाला
अनेक आरसीबी चाहत्यांचा या मागणीला पाठिंबा –
या मागणीने सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. अनेक आरसीबी चाहत्यांनी या मागणीला पाठिंबा दर्शवला असून, काहींनी मजेशीर टिप्पण्या करत या सुट्टीच्या मागणीला “क्रिकेटप्रेमींची क्रांती” असे संबोधले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पत्राची प्रत बघता अनेकांनी याला “विराट कोहलीच्या चाहत्यांचा उत्साह” असेही म्हटले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या मागणीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
हेही वाचा – Singapore Open : सात्विक-चिरागची सिंगापूर ओपनमध्ये दमदार आगेकूच, उपांत्य फेरीत दाखल
मात्र, असे मानले जाते की ही मागणी गमतीशीर स्वरूपाची असली, तरी ती आरसीबीच्या प्रचंड लोकप्रियतेचे आणि चाहत्यांच्या निष्ठेचे प्रतीक आहे. आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली याच्यासह संघाने यंदा सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे, ज्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा शिगेला पोहोचल्या आहेत. आता सर्वांचे लक्ष ३ जून रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. चाहत्यांच्या या अनोख्या मागणीमुळे कर्नाटकातील क्रिकेटप्रेमींचा उत्साह आणखी वाढला आहे.





