Bengaluru Stampede : ‘…तर RCB वर बंदी घातली जाणार’, विराटच्या संघावर का होऊ शकते कारवाई, काय आहे BCCI चा नियम?

Bengaluru Stampede RCB Faces BCCI Action : आयपीएल २०२५ चा खिताब जिंकल्यानंतर आरसीबीसाठी एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर विजयी मिरवणूक आणि भव्य उत्सवाची तयारी करण्यात आली होती. मात्र, या दरम्यान स्टेडियमबाहेर प्रचंड चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरसीबीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच, केसीएच्या दोन अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. या प्रकरणात एका व्यक्तीला अटकही झाली आहे. या सर्व घडामोडींमुळे आरसीबी अडचणीत सापडली आहे.
या घटनेनंतर बीसीसीआय आयपीएल २०२६ मध्ये आरसीबीच्या सहभागाबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. आरसीबीच्या विजयोत्सवात इतक्या मोठ्या चुकीसाठी कोण जबाबदार आहे याचा शोध घेण्यासाठी सध्या चौकशी सुरू आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआयसमोर मोठा प्रश्न असा आहे की जर या चुकीत आरसीबी संघ व्यवस्थापनाचे नाव आले तर पुढे काय निर्णय घ्यायचा.
‘#ArrestKohli‘ Hashtag Trends On ‘X’ After #BengaluruStampede Tragedy, Here’s Why
Mathew Hayden said : If such tragedy had happened in Australia during our victory celebrations, we would’ve thrown the trophy in the dustbin. Human lives are far more valuable than any trophy. pic.twitter.com/pRhggMxXYO
— DivineDiva ❤️ (@potus021) June 6, 2025
बीसीसीआयचा काय आहे नियम?
आयपीएलमधील सर्व फ्रँचायझी व्यावसायिक संस्था म्हणून काम करतात, परंतु त्यांचा सहभाग बीसीसीआयच्या करारांद्वारे नियंत्रित केला जातो आणि त्या करारांमध्ये सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित अनेक कलमे देखील समाविष्ट आहेत. या नियमांच्या आधारे आरसीबीविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते. जर चौकशीत या गंभीर निष्काळजीपणासाठी आरसीबी व्यवस्थापन थेट जबाबदार आढळले, तर बीसीसीआयला न्याय देण्यासाठी आणि लीगची विश्वासार्हता राखण्यासाठी आरसीबीविरुद्ध मोठी कारवाई करावी लागू शकते.
चेंगराचेंगरीत ११ निष्पाप चाहत्यांचा बळी –
मंगळवारी आरसीबीने पंजाब किंग्जचा पराभव करून पहिले विजेतेपद पटकावले. त्यानंतर संपूर्ण संघ आणि बंगळुरूचे चाहते खूप आनंदी होते. दुसऱ्या दिवशी बुधवारी संघ बंगळुरूला पोहोचला, जिथे तो त्याच्या चाहत्यांसोबत विजय साजरा करणार होता. पण हे उत्सवी वातावरण काही क्षणातच शोकात रूपांतरित झाले. लाखो लोकांच्या गर्दीमुळे अचानक चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये ११ जणांना आपले प्राण गमवावे लागले आणि अनेक जण जखमी झाले.





