Shreyas Iyer : श्रेयसने भारताच्या व्हाइट-बॉल कॅप्टन्सीसाठी ठोकला दावा, रोहित-सूर्याच्या कर्णधारपदावर टांगती तलवार

Shreyas Iyer Emerges as Contender Team India Captaincy : श्रेयस अय्यरने आयपीएलच्या मागील दोन हंगामांमध्ये कर्णधार म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने धावाही भरपूर केल्या आहेत. कर्णधार म्हणून, श्रेयसने आयपीएल २०२४ मध्ये केकेआरला विजेतेपद मिळवून दिले होते. तसेच यंदा पंजाब किंग्सला अंतिम सामन्यापर्यंत नेले. तो बराच काळ भारतीय टी-२० संघाबाहेर आहे. वनडे संघात त्याने पुनरागमन केले आहे, परंतु कसोटी संघात त्याला पुन्हा एकदा दुर्लक्षित करण्यात आले आहे. मात्र, आता थेट कर्णधारपदासाठी दावा ठोकला आहे.
श्रेयस अय्यरने टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी ठोकला दावा –
श्रेयस अय्यर आता व्हाइट-बॉल क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. सध्या रोहित शर्मा एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे, तर सूर्यकुमार यादव टी-२० संघाचे नेतृत्व करत आहे. मीडियाच्या अहवालानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर श्रेयस अय्यर आता कर्णधारपदाच्या शर्यतीत आला आहे.
🚨 Shreyas Iyer is now a white ball captaincy candidate🚨
According to a BCCI official, they are looking Shreyas as future white ball captain and his T20I & Test comeback is also not far away. Expect a test comeback vs WI & T20I comeback in next series.pic.twitter.com/XguRcQ7RkN
— Rajiv (@Rajiv1841) June 7, 2025
श्रेयसला टी-२० आणि कसोटी सामन्यांतून वगळता येणार नाही –
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “श्रेयस अय्यर सध्या फक्त वनडे खेळतो, पण या आयपीएलनंतर आम्ही त्याला टी-२० आंतरराष्ट्रीय आणि कसोटी सामन्यांमधूनही वगळू शकत नाही. शिवाय, तो आता अधिकृतपणे व्हाइट बॉल क्रिकेटच्या कर्णधारपदाच्या शर्यतीतही सामील झाला आहे.”
हेही वाचा – Andre Russell : ‘कसोटी क्रिकेट फक्त मोठ्या देशांसाठीच खास…’, कोहलीच्या आवाहनला रसेलचे चोख प्रत्युत्तर
श्रेयसची आयपीएल २०२५ मध्ये अप्रतिम कामगिरी –
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली, पंजाब किंग्जने आयपीएल २०२५ मध्ये अंतिम फेरी गाठली. २०१४ नंतर पहिल्यांदाच पंजाबचा संघ अंतिम फेरीत पोहोचला, जिथे तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ६ धावांनी पराभूत झाला. पंजाब किंग्जकडून खेळताना त्याने १७ सामन्यांमध्ये ६०४ धावा केल्या, ज्यामध्ये त्याने ६ अर्धशतकं झळकावली.
हेही वाचा – Yashasvi Jaiswal Controversy : जैस्वालच्या एलबीडब्ल्यूवरुन वाद; पंचांशी हुज्जत घातल्याने मैदानावर तणाव
विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी श्रेयस अय्यरने हा केंद्रीय करारमध्ये पण नव्हता. त्याला कसोटी आणि टी-२० संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर, २०२४ मध्ये केकेआरला चॅम्पियन बनवल्यानंतर तो केकेआरपासूनही वेगळा झाला होता. मात्र, यानंतर श्रेयसने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर आयपीएल २०२५ मध्येही भरपूर धावा केल्या.





