LSG vs RCB : आरसीबीने रचला इतिहास! आयपीएलमध्ये ‘हा’ मोठा पराक्रम करणारा ठरला पहिलाच संघ

LSG vs RCB Royal Challengers Bengaluru create history : आयपीएल २०२५ च्या शेवटच्या लीग सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शानदार कामगिरी करत लखनौ सुपर जायंट्सचा ६ विकेट्सने पराभव करून इतिहास रचला. या सामन्यात, आरसीबीने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आरसीबी आयपीएलच्या इतिहासात घराबाहेर खेळलेले सर्व सामने जिंकणारा पहिला संघ बनला आहे. या हंगामात संघाने ७ सामने विरोधी संघाच्या होमग्राऊंडवर खेळले आणि ते सर्व जिंकले.
जे आतापर्यंत कोणत्याही संघाला जमले नव्हते. त्यामुळे त्यांच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. यापूर्वी हा विक्रम मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या नावावर होता, ज्यामध्ये दोन्ही फ्रँचायझींनी आयपीएल दरम्यान त्यांच्या आठ पैकी सात सामने जिंकले होते. दोन्ही संघांनी २०१२ मध्ये ही कामगिरी केली होती. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने घरच्या मैदानावर ६ सामने जिंकले.
We chased history, made a bold statement, and now we march into the playoffs with fire in our hearts! ❤️🔥 pic.twitter.com/EV3giaLAQ7
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 28, 2025
एका आयपीएल हंगामात घरच्या मैदानाबाहेर सर्वाधिक विजय मिळवणारे संघ:
- ७ पैकी ७ – आयपीएल २०२५ दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
- ८ पैकी ७ – आयपीएल २०१२ दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स
- ८ पैकी ७ – आयपीएल २०१२ दरम्यान मुंबई इंडियन्स
- ६ – आयपीएल २०१२ दरम्यान दिल्ली कॅपिटल्स
- ६ – आयपीएल २०२३ दरम्यान गुजरात टायटन्स
हेही वाचा – LSG vs RCB : ऋषभ पंतला RCB विरुद्धच्या सामन्यातील ‘ती’ चूक पडली महागात, बीसीसीआयने ठोठावला मोठा दंड
या सामन्यादरम्यान, आरसीबीचा फलंदाज विराट कोहलीने चालू हंगामातील आठवे अर्धशतक झळकावले. आयपीएल हंगामात सात अर्धशतकांचा मागील विक्रम कोहली, डेव्हिड वॉर्नर आणि शुबमन गिल (प्रत्येकी सात) यांच्या नावावर होता. जितेश शर्माने नाबाद ८५ धावा करत आरसीबीला ६ विकेटने विजय मिळवून दिला. आरसीबीने आतापर्यंतचा त्यांचा सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग पूर्ण केला आहे. स्पर्धेच्या इतिहासातील हा त्यांचा सर्वात मोठा धावांचा पाठलाग आहे.
हेही वाचा – RCB vs LSG: जितेशच्या वादळी खेळीच्या जोरावर बंगळुरूचा लखनौवर दणदणीत विजय
आतापर्यंत आरसीबीने २०० पेक्षा जास्त धावांचा केलेला यशस्वी पाठलाग:
- २२८ विरुद्ध एलएसजी, लखनौ, २०२५
- २१५ विरुद्ध दक्षिण ऑस्ट्रेलिया, बंगळुरू, सीएलटी२०, २०११
- २०४ विरुद्ध पीबीकेएस, बंगळुरू, २०१०
- २०४ विरुद्ध एनएसडब्ल्यू, बंगळुरू, सीएलटी२०, २०११
- २०१ विरुद्ध जीटी, अहमदाबाद, २०२४





