LSG vs RCB : ऋषभ पंतला RCB विरुद्धच्या सामन्यातील ‘ती’ चूक पडली महागात, बीसीसीआयने ठोठावला मोठा दंड

LSG vs RCB BCCI fines LSG captain Rishabh Pant 30 lakh rupees and penalizes : आयपीएल २०२५ मध्ये लखनौ सुपर जायंट्सचा प्रवास संपला आहे. संघाने आपला शेवटचा लीग सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध खेळला. जिथे संघाला ६ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला, मात्र या सामन्यात लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने शानदार शतक झळकावले. त्यानंतर संघाला आपल्या २२७ धावांचा बचाव करता आला नाही. यानंतर ऋषभ पंतला आणि त्याच्या संघाला मोठा धक्का बसला. कारण बीसीसीआयने मोठा दंड ठोठावला आहे.
ऋषभ पंतला ३० लाखांचा दंड –
आयपीएल २०२५ च्या ७० व्या सामन्यानंतर बीसीसीआयने लखनौचा कर्णधार ऋषभ पंतला स्लो ओव्हर रेटसाठी ३० लाखांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय, दिग्वेश राठीसह सर्व खेळाडूंचे सामना शुल्कही कपात करण्यात आले आहे. या हंगामात एलएसजीचा हा तिसरा गुन्हा होता (पहिला आणि दुसरा गुन्हा अनुक्रमे ५ एप्रिल आणि २६ एप्रिल रोजी झाला होता).
118(61) 🔥🛐💀 #RishabhPant pic.twitter.com/kqlF2OSKmx
— 🐯Tarak JP (@tarak_jp_) May 27, 2025
ऋषभसह संघातील सर्व खेळाडूंना दंड –
ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आयपीएलच्या आचारसंहितेनुसार पंतला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. उर्वरित प्लेइंग इलेव्हनमध्ये, ज्यात इम्पॅक्ट खेळाडूंचा समावेश आहे, त्यांना वैयक्तिकरित्या १२ लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या ५० टक्के (जे कमी असेल ते) दंड ठोठावण्यात आला. ऋषभ पंतचा हा तिसरा गुन्हा होता, पण आयपीएल २०२५ मधील सुधारित नियमांनुसार त्याला निलंबित केले जाणार नाही.
हेही वाचा – RCB vs LSG: जितेशच्या वादळी खेळीच्या जोरावर बंगळुरूचा लखनौवर दणदणीत विजय
मात्र, आयपीएल २०२५ मध्ये या नियमात सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे ऋषभ पंतवर एका सामन्याची बंदी घातली जाणार आहे. मागील हंगामातील तीन गुन्ह्यासाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला आयपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यासाठी बंदी घातली होती. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतने ६१ चेंडूंत ११ चौकार आणि ८ षटकाराच्या जोरावर नाबाद ११८ धावांची खेळी साकारली.





