DC vs RCB : आरसीबीने दिल्लीचा धुव्वा उडवत पटकावले अव्वल स्थान, विराट-कृणालने झळकावली अर्धशतकं

DC vs RCB Royal Challengers Bangalore beat Delhi Capitals : आरसीबीने दिल्लीचा त्यांच्या घरच्या मैदानावर झालेल्या रोमांचक सामन्यात ६ गडी राखून पराभव केला. यासह, बंगळुरूने हंगामातील आपला ७ वा विजय नोंदवला आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. आरसीबीसाठी विराट कोहली आणि कृणाल पंड्याने उत्कृष्ट फलंदाजी करत अर्धशतकं झळकावली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने १६३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात आरसीबीने १८. ३ षटकांत ४ गडी गमावून १६५ धावा करुन विजयावर शिक्कामोर्तब केला.
आरसीबीने गुणतालिकेत पटकावले अव्वल स्थान-
या विजयासह, आरसीबी संघ १४ गुणांसह आणि ०.५२१ च्या नेट रन रेटसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला. रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली बंगळुरूने १० पैकी सात सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, नऊ पैकी सहा सामने जिंकणारा आणि तीन गमावलेला दिल्ली १२ गुणांसह आणि ०.४८२ नेट रन रेटसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. गुजरात आणि मुंबई इंडियन्स अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. दोघांच्याही खात्यात १२-१२ गुण आहेत.
🔝 of the points table ✅
Unbeaten away from home ✅@RCBTweets are flying high and above with yet another convincing victory tonight ❤Scorecard ▶ https://t.co/9M3N5Ws7Hm#TATAIPL | #DCvRCB pic.twitter.com/OIjrI13Bzd
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2025
विराट-कृणालने साकारली ११९ धावांची भागीदारी –
When it mattered the most 🤌
Maiden FIFTY of the season for Krunal Pandya 😎
He continues to add value to the #RCB chase 🏃
Updates ▶ https://t.co/9M3N5Ws7Hm#TATAIPL | #DCvRCB | @krunalpandya24 pic.twitter.com/9D9McH0wxs
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2025
लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची या सामन्यात सुरुवात खराब झाली. संघाने २६ धावांवर तीन विकेट्स गमावल्या होत्या. अक्षर पटेलने जेकब बेथेल (१२) आणि देवदत्त पडिक्कल (०) यांची विकेट्स घेतली. दरम्यान, करुण नायरने कर्णधार रजत पाटीदारला धावबाद करून दिल्ली तिसरी विकेट्स मिळवून दिली. यानंतर, विराट कोहली आणि कृणाल पंड्याने जबाबदारी स्वीकारली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी केली, जी कोणत्याही आरसीबी जोडीने केलेली सर्वोच्च भागीदारी आहे आणि या हंगामात चौथ्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी देखील आहे. दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करून आरसीबीला शानदार विजय मिळवून देण्यात या दोघांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.
हेही वाचा – MI vs LSG : रोहित शर्माने केला नवा पराक्रम! IPL इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा खेळाडू
कोहलीने चालू हंगामातील सहावे अर्धशतक झळकावले –
Run chase? Call Virat Kohli 🫡
Another composed fifty from the chase maestro!
Will he take #RCB over the line?
Updates ▶ https://t.co/9M3N5Ws7Hm#TATAIPL | #DCvRCB | @imVkohli pic.twitter.com/FBNPMxKPlA
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2025
यादरम्यान, कृणाल पंड्याने ३८ चेंडूत त्याच्या कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. याआधी त्याने २०१६ मध्ये अर्धशतक ठोकले होते. ४७ चेंडूत ७३ धावा काढल्यानंतर तो नाबाद राहिला. या काळात त्याच्या बॅटमधून पाच चौकार आणि चार गगनचुंबी षटकार पाहिला मिळाले. त्याच वेळी, किंग कोहलीने चालू हंगामातील त्याचे सहावे अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने चार चौकारांच्या मदतीने ५१ धावांची महत्त्वाची खेळी खेळली. टिम डेव्हिडने पाच चेंडूत १९ धावा काढून नाबाद राहिला.





