MI vs LSG Rohit Sharma’s Record Breaking Sixes in IPL Powerplay : आयपीएल २०२५ मध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात ५४ धावांनी विजय मिळवून मुंबई इंडियन्स संघाने प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा आपला दावा मजबूत केला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. रोहित शर्माने फक्त १२ धावांची खेळी केली, पण त्याच्या बॅटमधून आलेल्या २ षटकारांमुळे तो एक मोठा पराक्रम करण्यात यशस्वी झाला.
रोहित आयपीएलमध्ये ही कामगिरी करणारा ठरला तिसरा सलामीवीर –
लखनौविरुद्धच्या सामन्यात रोहितने त्याच्या डावातील पहिले दोन चेंडू थेट स्टँडमध्ये मारले. त्यानंतर सर्वांना वाटले की आज त्याच्या बॅटमधून मोठी खेळी दिसेल, परंतु रोहित पुन्हा ५ चेंडूत १२ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. परंतु, दोन षटकार मारून, रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात त्याच्या डावाच्या पहिल्या दोन चेंडूंवर सलग दोन षटकार मारणारा तिसरा सलामीवीर फलंदाज बनला. याआधी यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांनी ही कामगिरी केली आहे.
Back to back Pull Shots Dream For Some 18 Batter .🤧#RohitSharma #MIvsLSGpic.twitter.com/kZFKI1FVwX
— 𝑺𝒆𝒍𝒇𝒍𝒆𝒔𝒔 𝑺𝒉𝒂𝒓𝒎𝒂🐐⁴⁵ 2.0 (@RohitSharmai) April 27, 2025
आयपीएलमध्ये पहिल्या २ चेंडूंवर षटकार मारणारे सलामीवीर फलंदाज :
- विराट कोहली – विरुद्ध राजस्थान रॉयल्स (२०१९)
- यशस्वी जैस्वाल – विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (२०२३)
- रोहित शर्मा – विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (२०२५)
हेही वाचा – MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा ऐतिहासिक विजय, IPL च्या १८ वर्षांत ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच संघ
रोहित पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा खेळाडू ठरला –
लखनौविरुद्धच्या सामन्यात २ षटकार मारून, रोहित आता आयपीएलमध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहितने या यादीत डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले आहे, ज्याच्या नावावर आयपीएलमध्ये एकूण १०५ षटकार मारण्याचा विक्रम आहे. या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर ख्रिस गेल आहे, ज्याने पॉवर प्लेमध्ये फलंदाजी करताना आयपीएलमध्ये एकूण १४३ षटकार मारले आहेत.
हेही वाचा – MI vs LSG : मुंबईने घेतला पराभवाचा बदला! जसप्रीत बुमराहसमोर लखनौच्या फलंदाजांची उडाली भंबेरी
पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू :
- ख्रिस गेल – १४३ षटकार
- रोहित शर्मा – १०७ षटकार
- डेव्हिड वॉर्नर – १०५ षटकार
- क्विंटन डी कॉक – ८२ षटकार