रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर ‘जैसे थे’ ;पुढील तिमाहित जीडीपी वाढीचा दर सकारात्मक राहणार ?

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी समितीद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. पुढील काही महिने अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे दास यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर पुढील तिमाहित जीडीपी वाढीचा दर सकारात्मक राहण्याची शक्यताही यावेळी त्यांनी वर्तवली. दरम्यान, यावेळीही रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. २ डिसेंबर पासून रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीच्या बैठकीला सुरूवात झाली होती.
“रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. रेपो दर हे चार टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहे. बैठकीत सर्व सदस्यांच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती दास यांनी यावेळी दिली. तर दुसरीकडे रिव्हर्स रेपो दरही ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहेत. बँक रेटमध्येदेखील कोणतेही बदल करण्याचा निर्णय झाला नाही. ते ४.२५ टक्क्यांवर आणि कॅश रिझर्व्ह रेशो तीन टक्क्यांवर कायम असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, पुढील काळात महागाई दर नियंत्रणात येईल अशी शक्यताही वर्तवण्यात आली.
We are projecting GDP growth for Q3 at +0.1% and +0.7% for Q4: RBI Governor Shaktikanta Das https://t.co/EDznDqagXq
— ANI (@ANI) December 4, 2020
MPC decided to continue with accommodative stands of monetary policy as long as necessary, at least till current financial year & into next year to revive growth on a durable basis & mitigate the impact of COVID-19 while ensuring that inflation remains within target: RBI Governor https://t.co/XjbTZ58gx5
— ANI (@ANI) December 4, 2020
“अर्थव्यवस्थेत पुरेशी रोख रक्कम उपलब्ध असेल याची आम्ही खात्री देतो. तसंच गरज भारल्यास आवश्यक ती पावलंही उचलली जातील. पुढील तिमाहीतील जीडीपी वाढीचा अंदाज वाढवून ०.१० टक्के करण्यात आला आहे. तर त्याच वेळी, चौथ्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२१ दरम्यान देशातील जीडीपी वाढ ०.७० टक्के राहिल असा अंदाज आहे,” असे दास म्हणाले. तसंच संपूर्ण वर्षासाठी जीडीपी वाढीचा दर उणे ७.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.





