Border Gavaskar Trophy | शाब्बास जड्डू! पठ्ठ्या दुखापतीतून सावरला अन् टीम इंडियासाठी केली धमाल कामगिरी

Border Gavaskar Trophy – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यास सुरुवात झाली आहे. सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून पाहुण्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने अगोदर फलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. मात्र, कमिन्सचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी साफ चुकीचा ठरवला आणि पाहुणा संघ अवघ्या १७७ सर्वबाद झाला. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ५ गडी बाद केले. त्याच्या फिरकी गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज हतबल झाल्याचे दिसले.
Border Gavaskar Trophy | जडेजा-अश्विनने घेतली ऑस्ट्रेलियाची फिरकी; पहिल्या दिवसअखेर भारताचे वर्चस्व
रवींद्र जडेजाच्या दमदार कामगिरीमुळे भारताने पहिल्या दिवसाच्या खेळात वर्चस्व राखले. जडेजाने मोठ्या कालावधीच्या अंतरानंतर भारतीय संघात पुनरागमन केलेले आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. जडेजाने खेळपट्टीचा फायदा घेत ऑस्ट्रेलियन संघाच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला आणि बाली मिळवले. त्याचबरोबर आर. अश्विनच्या साथीमुळे दोन्ही फिरकीपटूंनी पाहुण्या संघाला कमी धावसंख्येवरच रोखण्यात यश मिळवले. अश्विनने दमदार गोलंदाजी करत ३ गडी बाद केले.
सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनी सलामीच्या डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा या जोडीला तंबूची वाट दाखवली. त्यानंतर भारतीय गोलंदाजीचा मोर्चा आर.आश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी सांभाळला. या दोन्ही फिरकी गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाज पूर्णपणे दबावात खेळताना दिसले.
🗣️🗣️ I found great rhythm with my bowling today#TeamIndia all-rounder @imjadeja reflects on his super five-wicket haul on Day 1️⃣ of the first #INDvAUS Test.@mastercardindia pic.twitter.com/PBo8camct0
— BCCI (@BCCI) February 9, 2023
सामन्याच्या पहिल्या डावात जडेजाने २२ षटके गोलंदाजी केली आणि सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर आश्विनने १५ षटके गोलंदाजी केली आणि पाहुण्या संघाच्या ३ गड्यांना तंबूत पाठवले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात अवघ्या १७७ धावांत सर्वबाद झाला. भारताने प्रत्युत्तरात केएल राहुलची विकेट गमावली असून ७७ धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करत ६९ चेंडूत ५६ धावा फाटकावल्या असून तो नाबाद खेळत आहे.
पहिल्या दिवसाचा दिवसाचा खेळ संपल्यानंतर बोलताना रवींद्र जडेजाने म्हटले की, “मी एनसीएमध्ये दररोज 10-12 तास गोलंदाजी करत होतो. मी माझ्या फिरकीवर विशेष काम करत होतो कारण मला माहित होते की मला लांबपर्यंत स्पेल टाकायचे आहेत. मी सामन्याआधी खूप तयारी करत होतो. हातातून चेंडू बरोबर जात होता. लाईन लेन्थ चांगली होती. मला माहिती होते या खेळपट्टीवर बाउन्स नाही त्या हिशोबाने गोलंदाजी केली. त्यामुळेच मला बोल्ड आणि एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून बळी घेता आले.”





