IND vs ENG : रवींद्र जडेजाने केला ‘वर्ल्डरेकॉर्ड’! WTC मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू

Ravindra Jadeja World Record : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत ६ बाद ४१९ धावांचा डोंगर उभारला आहे. दरम्यान या डावात रवींद्र जडेजाने ८९ धावांची खेळी साकारत भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहोचवण्यात कर्णधार गिलसह महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच त्याने या खेळीच्या जोरावर एक मोठा विश्वविक्रम केला आहे.
रवींद्र जडेजाने केला वर्ल्डरेकॉर्ड –
या सामन्यात रवींद्र जडेजाने १३७ चेंडूचा सामना करताना १० चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ८९ धावांची खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर त्याने एक खास विक्रम नोंदवला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप) २००० धावा आणि १०० विकेट्स घेणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. जडेजाने या स्पर्धेतील ४१ सामन्यांत १३२ विकेट्स घेतले असून, इंग्लंडविरुद्धच्या ८९ धावांच्या खेळीसह त्याने २००० धावांचा टप्पाही पूर्ण केला.
रवींद्र जडेजाने रचला इतिहास –
2000+ runs ✅
100+ wickets ✅Ravindra Jadeja becomes the first-ever player to achieve this elite double in WTC history! 🇮🇳🤍🐐#Tests #WTC #India #RavindraJadeja #Sportskeeda pic.twitter.com/G6HA0Szn4T
— Sportskeeda (@Sportskeeda) July 3, 2025
रवींद्र जडेजाने बर्मिंगहम येथील एजबेस्टन मैदानावर सुरू असलेल्या भारत-इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (WTC) २००० धावा पूर्ण केल्या. त्याला या टप्प्यासाठी ७९ धावांची गरज होती, आणि दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ७९ धावा करत त्याने हा टप्पा गाठला. यासह, तो WTC मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे.
हेही वाचा – IND vs ENG : शुबमन गिलने मोडला विराटचा सर्वात मोठा विक्रम; बर्मिंगहॅममध्ये लिहिला नवा इतिहास!
WTC मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज:
- रोहित शर्मा – २७१६
- विराट कोहली – २६१७
- ऋषभ पंत – २५२९
- शुबमन गिल – २२१६*
- रवींद्र जडेजा – २०१०
- यशस्वी जयस्वाल – १९९०
- चेतेश्वर पुजारा – १७६९
- अजिंक्य रहाणे – १५८९
- केएल राहुल – १५३३
- मयंक अग्रवाल – १२९३
भारतीय ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील शानदार कारकीर्दीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अश्विनने WTC मध्ये भारतासाठी ४१ सामन्यांत १९५ बळी घेतले आणि १४२ धावाही केल्या. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले. तो WTC मध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू आहे.
हेही वाचा – SL vs BAN : लाइव्ह सामन्यात ७ फूट लांब सापाचा थरार, VIDEO होतोय व्हायरल
WTC मध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज:
- रविचंद्रन अश्विन – १९५
- जसप्रीत बुमराह – १६१
- रवींद्र जडेजा – १३२
- मोहम्मद सिराज – १०२
- मोहम्मद शमी – ८५





