CSK vs SRH : फलंदाजी करण्यापासून रोखताच संतापला जडेजा; मैदानातच आपटू लागला बॅट, पाहा VIDEO

CSK vs SRH Ravindra Jadeja Fails Bat Size Test in IPL 2025 : आयपीएल २०२५ मधील ४३ व्या सामन्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आले होते. या सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद १५१ धावा केल्या. दरम्यान या सामन्यात रवींद्र जडेजा हा अनिवार्य असलेल्या बॅट साईज टेस्टमध्ये फेल ठरला. पॉवरप्ले दरम्यान जडेजा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि मैदानावरील पंचांनी त्याच्या बॅटचा आकार तपासण्यासाठी लगेच त्याच्याकडे गेले.
रवींद्र जडेजा बॅट साईज टेस्टमध्ये ठरला फेल –
या सामन्यात रवींद्र जडेजा मैदानावर येताच मैदानावरील पंचांनी त्याच्या बॅटच्या साईजची टेस्ट घेतली. पण त्याच्या बॅटचा आकार नियमांनुसार नव्हता. जडेजा नियमांचे निकष पूर्ण करत नव्हता. त्यामुळे पंचांनी त्याला त्याच्या पहिल्या पसंतीची बॅट वापरण्याची परवानगी नाकारली. त्यानंतर रवींद्र जडेजा रागावलेला दिसत होता. जडेजानेही त्याची बॅट जमिनीवर आपटली. मात्र, यानंतरही तो बॅट साईज टेस्टमध्ये पास होऊ शकला नाही आणि त्याला त्याची बॅट बदलावी लागली, त्यानंतरच तो फलंदाजी करू शकला.
what is this jadeja bro #CSKvsSRHpic.twitter.com/dodzVKoMNI https://t.co/PbTnwKuLOU
— 𝐧𝐨𝐛𝐛𝐢𝐞𝐬𝐪𝐮𝐞² (@RibelRana07) April 25, 2025
Ravindra Jadeja’s bat didn’t fit under the new IPL’s rules & regulations 👀#IPL #IPL2025 #CSKvsSRH #ChennaiSuperKings #RavindraJadeja #SunrisersHyderabad pic.twitter.com/ZOMJKXK5sr
— XtraTime (@xtratimeindia) April 25, 2025
या सामन्यात रवींद्र जडेजा फलंदाजीने फारसे योगदान देऊ शकला नाही. त्याने १७ चेंडूत १२३.५२ च्या स्ट्राईक रेटने २१ धावा केल्या. या काळात त्याच्या बॅटमधून १ चौकार आणि १ षटकार निघाला. यानंतर, कामिंदू मेंडिसच्या एका शानदार चेंडूवर तो क्लीन बोल्ड झाला. या हंगामात जडेजासाठी आतापर्यंत काही खास राहिलेले नाही. त्याला ९ सामन्यांमध्ये २७.६६ च्या सरासरीने फक्त १६६ धावा करता आल्या आहेत. ज्यामध्ये १ अर्धशतक समाविष्ट आहे.
हेही वाचा – CSK vs SRH : मोहम्मद शमीने पहिल्या चेंडूवर रचला इतिहास! अन् दुसऱ्याच चेंडूवर केली मोठी चूक, पाहा VIDEO
२०१९ नंतर पहिल्यांदाच सीएसके चेपॉकवर ऑल आऊट –
सामन्याबद्दल बोलायचे, तर हर्षल पटेलच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर हैदराबादने चेन्नईला १५४ धावांवर रोखले. २०१९ नंतर चेपॉकवर संघ ऑलआउट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर चेन्नईने हैदराबादसमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यांच्याकडून डेवाल्ड ब्रेव्हिसने सर्वाधिक ४२ धावांची खेळी खेळली. हैदराबादकडून हर्षल पटेलने चार तर पॅट कमिन्स आणि जयदेव उनाडकटने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय मोहम्मद शमी आणि कामिंदू मेंडिस यांना प्रत्येकी एक विकेट्स मिळाली.





