Ravindra Jadeja Celebration : तुला खिशात ठेवतो…! जडेजाचा माज की आत्मविश्वास?बटलरलच्या विकेटनंतर वादग्रस्त सेलिब्रेशन, पाहा VIDEO
Ravindra Jadeja Celebration : जडेजाने बटलरला बाद केल्यानंतर केलेल्या एका अजब सेलिब्रेशनमुळे आता सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे.

Ravindra Jadeja Controversial Pocket Celebration Video Viral : आयपीएल २०२६ मधील राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात भारताचा दिग्गज फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि इंग्लंडचा स्टार फलंदाज जोस बटलर यांच्यात हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. जडेजाने बटलरला बाद केल्यानंतर केलेल्या एका अजब सेलिब्रेशनमुळे आता सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे.
बटलरला ‘खिशात’ घातल्याचा इशारा –
ही घटना सामन्याच्या १४ व्या षटकात घडली. रवींद्र जडेजाने टाकलेल्या एका फुल लेंथ चेंडूवर जोस बटलरने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटवर नीट न आल्याने तो थेट लॉंग-ऑफला असलेल्या डोनोव्हन फरेराच्या हातात गेला. बटलर बाद होऊन पॅव्हेलियनकडे परतत असताना, जडेजाने आपल्या खिशाकडे हात नेऊन बटलरला जणू ‘खिशात’ टाकल्याचा इशारा केला. जडेजाचे हे आक्रमक रूप पाहून काही चाहत्यांनी त्याचे कौतुक केले, तर अनेकांनी हे वर्तन बटलरचा अपमान करणारे असल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.
Wicket in the pocket ☝️
Celebrations out 🥳
Ravindra Jadeja doing what he does best 🩷
Updates ▶️ https://t.co/t7CEEL9Bzp#TATAIPL | #KhelBindaas | #RRvGT | @rajasthanroyals pic.twitter.com/qGBNr38o4S
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2026
जडेजाचे बटलरवर वर्चस्व –
THE CELEBRATION BY RAVINDRA JADEJA AFTER GETTING JOS BUTTLER. pic.twitter.com/ghLQxCLzEX
— Nafees (@Nafees_22) May 9, 2026
रवींद्र जडेजा आणि जोस बटलर यांच्यातील मैदानी संघर्ष जुनाच आहे. आकडेवारी पाहिली तर टी-२० क्रिकेटमध्ये जडेजा नेहमीच बटलरवर भारी पडला आहे. आतापर्यंत हे दोघे १२ वेळा आमनेसामने आले असून जडेजाने बटलरला ३ वेळा बाद केले आहे. विशेष म्हणजे, बटलरने जडेजाच्या ६६ चेंडूंवर केवळ ८२ धावा केल्या असून त्याचा स्ट्राईक रेट अवघा १२४.२४ इतका राहिला आहे.कदाचित आपला हाच दबदबा दाखवण्यासाठी जडेजाने हे आगळेवेगळे सेलिब्रेशन केले असावे, असे बोलले जात आहे. सध्या जडेजच्या या कृतीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून, क्रिकेट वर्तुळात या सेलिब्रेशनच्या नैतिकतेवर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा – Jofra Archer Record : जोफ्रा आर्चरचा नकोसा विक्रम! पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल इतके चेंडू टाकणारा ठरला पहिलाच गोलंदाज
या सामन्यात गुजरात टायटन्सचे सलामीवीर शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी एक ऐतिहासिक सलामीची भागीदारी रचली. या दोघांनी ६५ चेंडूंमध्ये ११८ धावांची धडाकेबाज सलामीची भागीदारी केली. या धावसंख्येवर, यशराज पुंजाच्या षटकात बाद झालेल्या साई सुदर्शनच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला. साईने ३६ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि दोन षटकारांसह ५५ धावा केल्या. यानंतर गुजरात टायटन्सने २० षटकात ४ गडी गमावून २२९ धावांचा डोंगर उभारला.





