RCB vs CSK : डेवाल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून जडेजाने पंचांशी घातला वाद, VIDEO होतोय व्हायरल

Ravindra Jadeja clashes with umpire in RCB vs CSK : आयपीएल २०२५ मध्ये, शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना झाला. ज्यामध्ये आरसीबीने पुन्हा एकदा विजय मिळवला. मात्र, या सामन्यात आरसीबीच्या विजयापेक्षा डेवाल्ड ब्रेव्हिसच्या विकेट्सची चर्चा जास्त होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आयपीएलच्या पंचगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सामन्यात सीएसकेचा अष्टपैलू रवींद्र जडेजाही पंचांशी भिडला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
रवींद्र जडेजाने पंचांशी घेतला पंगा –
खरं तर, २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयुष म्हात्रेने चेन्नईसाठी शानदार फलंदाजी केली. परंतु, त्याचे शतक फक्त ६ धावांनी हुकले. त्याने रवींद्र जडेजासोबत शतकी भागीदारी केली. पण, तो बाद होताच मैदानाच्या मध्यभागी असा नाट्यमय प्रकार घडला की तो पाहून सर्वजण थक्क झाले. आरसीबीचा गोलंदाज लुंगी एनगिडीच्या षटकात पंचांनी असा निर्णय दिला की चेन्नईचा हा अष्टपैलू खेळाडू त्यांच्याशी भिडला.
डेवाल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरुन झाला गोंधळ –
Time’s up ⌛
Dropped catches, scintillating boundaries, back-to-back wickets & endless drama… 🥶#ViratKohli vs #MSDhoni – one last time? Is living up to the expectations! Who’s winning it from here? 👇✍🏻
Watch the LIVE action ➡ https://t.co/dl97nUfgCR #IPLonJioStar 👉… pic.twitter.com/0uSxPYEoWL
— Star Sports (@StarSportsIndia) May 3, 2025
त्यानंतर, लाईव्ह सामन्यादरम्यान मैदानावरील वातावरण खूपच तापले. पंचांच्या या निर्णयाने चेन्नईचा विजय हिसकावून घेतला. २४ तासांत दुसऱ्यांदा खेळाडूंचा लाईव्ह सामन्यादरम्यान पंचांशी वाद झाला आहे. २ मे रोजी, जीटीचा कर्णधार शुबमन गिल देखील लाईव्ह सामन्यादरम्यान पंचांशी भिडला. झालं असं की चेन्नईच्या डावातील १७ वे षटक होते, तेव्हा आरसीबीचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी गोलंदाजी करत होता. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आयुष म्हात्रे बाद झाला.
हेही वाचा – RCB vs CSK : रवींद्र जडेजाने मारला १०९ मीटरचा उत्तुंग षटकार, स्टेडियमच्या छतावर पडला चेंडू, पाहा VIDEO
यानंतर डेवाल्ड ब्रेव्हिस फलंदाजीला आला. पण, षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर, एनगिडीने फुल टॉस टाकला जो ब्रेव्हिसने मारण्याचा प्रयत्न केला पण तो पूर्णपणे चुकला. पण, दरम्यान, पंचांनी ताबडतोब ब्रेव्हिसला पायचित घोषित केले. त्यानंतर त्याला रिव्ह्यू घ्यायचा होता, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. पंचांच्या या निर्णयावर रवींद्र जडेजा खूप संतापला आणि तो लाईव्ह सामन्यातच पंचांशी भिडला.





