Ravindra Chavan : महाराष्ट्र विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपचे आमदार आणि मंत्री यांच्या गैरहजेरीमुळे पक्षाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विरोधी पक्ष लक्षवेधी, चर्चा आणि इतर कामकाजात भाजपकडून पुरेशी उपस्थिती नसल्याने पक्षाचे कामकाज प्रभावित होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आमदार आणि मंत्र्यांवर नाराज झाले असून, त्यांनी याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्या मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्व आमदार आणि मंत्र्यांना तर बुधवारी पश्चिम महाराष्ट्र, ठाणे-कोकण आणि मुंबईमधील मंत्र्यांची बैठक आयोजित केली आहे. तसेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील मार्गदर्शन करणार आहे. या बैठकीत रवींद्र चव्हाण आमदार आणि मंत्र्यांचा ‘क्लास’ घेणार असून, अधिवेशनातील उपस्थिती आणि कामकाजाबाबत कडक सूचना देणार आहेत. मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हेही बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना भाजपच्या आमदार-मंत्र्यांची दांडीमुळे पक्षाला विधानसभेत लक्षवेधी मांडण्यात आणि चर्चेत अडचणी येत आहेत. विरोधकांनी याचा फायदा घेत सत्ताधारी पक्षावर टीका सुरू केली आहे. रवींद्र चव्हाण यांनी याबाबत कठोर कारवाईचा इशारा दिला असून, पक्षशिस्त राखण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.