Ravindra Chavan: माथाडी कामगारांच्या पाठीशी भाजपची ताकद! राज्यस्तरीय मेळाव्यात रवींद्र चव्हाणांची वक्तव्य
Ravindra Chavan: कामगारांचे प्रश्न कायदेशीर मार्गाने व सरकारशी संवाद साधून सोडवावेत; भाजप माथाडी कामगारांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा राहिल, रवींद्र चव्हाणांचे प्रतिपादन.

Ravindra Chavan- कामगार हा उद्योग-व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असून, त्यांच्यावर अन्याय होत असल्यास त्यांना न्याय मिळवून देणे आवश्यक आहे. कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारसोबत संवाद साधून कायदेशीर मार्गाने तोडगा काढावा. कामगारांच्या पाठीशी भाजप पूर्ण ताकदीने उभा आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले.
भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक, जनरल कामगार युनियनच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे राज्यस्तरीय माथाडी पदाधिकारी मेळावा मंगळवारी (दि. २९) आयोजित करण्यात आला होता. यावेळी चव्हाण बोलत होते. मेळाव्यास हजारो पदाधिकारी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, कामगारांच्या हितासाठी उपक्रम राबविताना त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणाचाही विचार करणे गरजेचे आहे.
शिक्षण, आरोग्य आणि विविध सोयी-सुविधा त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. कामगारांच्या मागण्यांसाठी संघटनांनी सरकारसोबत चर्चा करून कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडवावेत. कामगारांच्या हितासोबतच संघटनाही अडचणीत येणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. यावेळी युनियनचे संस्थापक तथा कामगार नेते अनुप मोरे म्हणाले की, ही संघटना पक्षाने जन्माला घातलेले बाळ आहे.
२०१४ मध्ये माथाडी युनियन सुरू केली असून, राज्यभरातून आतापर्यंत १५ हजार सदस्य जोडले आहेत. २०२९ पर्यंत ५० हजार सदस्य जोडण्याचे लक्ष्य आहे. २०२९ मध्ये राज्यात आणि देशात सत्ता आणण्यासाठी संघटनेचा सिंहाचा वाटा असेल, असा शब्द देत “तुम्ही आमच्या पाठीशी राहा. आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.





