क्रिकेट कॉर्नर : आर. अश्विन व कुलदीपवर भारताची मदार…

न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत वेगवान गोलंदाजांपेक्षा रविचंद्रन अश्विन व कुलदीप यादव यांच्यावरच मदार राहणार आहे. याला कारणही तसेच आहे एकतर हा सामना होत आहे पुण्यात. या खेळपट्टीवर पहिल्या दिवसापासूनच फिरकी गोलंदाजांना मदत मिळते.
बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर आपले वेगवान गोलंदाज अपयशी ठरले होते तसेच फिरकी गोलंदाजांनीही काही फारशी यशस्वी कामगिरी केली नव्हती. मात्र, त्या कसोटीतील हवामान वेगळे होते. पुण्याच्या खेळपट्टीवर मात्र, तसे होणार नाही. पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात वेगवान गोलंदाजंना मदत मिळेल. मात्र, त्यानंतर ही खेळपट्टी फलंदाजीसाठी नंदनवन ठरेल. तसेच फिरकीलाही मदत मिळेल.
या खेळपट्टीवर कशी गोलंदाजी करायची हे न्यूझीलंडला उमगले नाही, तर भारताच्या पथ्यावरच ही बाब पडणार आहे. अश्विन व कुलदीप अशा खेळपट्टीवर समोरच्या फलंदाजची भंबेरी उडवण्यात माहिर आहेत. त्यामुळे याच दोघांवर भारताच्या गोलंदाजीची मदार राहील. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याकडून दिवसातील अखेरच्या सत्रात रिव्हर्स स्विंग पाहायला मिळेल, असे सध्यातरी चित्र आहे. पुण्याच्या मैदानावीरल खेळपट्टीवर भेगा आत्ताच निर्माण झाल्या आहेत. त्यावर फलंदाजी करणे वाटते तेवढे सोपे ठरणार नसले तरही दुसऱ्या व तिसऱ्या सत्रापासून ही खेळपट्टी आपला स्वभाव बदलेल असाही अंदाज आहे. खेळपट्टी थोडी नरम असेल तर मंद होणार आहे.
फलंदाजांसमोर आव्हान निर्माण करणारे अश्विनचे स्ट्रेटर, कॅरम बॉल कमालीचे घातक ठरतील. कुलदीपचा रॉंंग वन देखील अनाकलनीय ठरेल. कुलदीप ॲक्शन बदलल्यापासून जास्त भेदक बनला आहे. मात्र, पहिल्या कसोटीत त्याने जी कामगिरी केली ती पाहता, या कसोटीत त्याला धडक्यात पुनगारमन करावे लागणार आहे. अश्विनचे कॅरम बॉल पहिल्या कसोटीत न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी लिलया खेळून काढले. इतकेच नव्हे तर त्यावर वाट्टेल तशी फलंदाजी केली. राचिन रवींद्र याच्यापासून पुण्याच्या कसोटीतही धोका आहे. त्याला रोखण्यासाठी अश्विन व कुलदीप यांना अत्यंत घातक गोलंदाजी करावी लागणार आहे.
खेळपट्टीवरील भेगा या दोन्ही गोलंदाजांना मदत करतील, त्याचा लाभ त्यांनी उठवलाच पाहीजे. कुलदीपचा रॉंगवन जास्त घातक असतो मात्र, पहिल्या कसोटीत त्याने अत्यंत दिशाहीन गोलंदाजी केली. त्याला अश्विननेही तशीच गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या धावसंख्येला हातभार लावला. वेगवान गोलंदजीत बुमराहसोबत महंमद सिराज आहे. मात्र, जितकी अपेक्षा फिरकी गोलंदाजंवर आहे, तितकीच या दोघांवर नाही. त्यातच रवींद्र जडेजा याच्याकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. तो कोणत्याही क्षणी बळी घेऊ शकतो मात्र, बंगळुरुच्या पहिल्या डावात त्याची गोलंदाजी पुर्ण निष्प्रभ ठरला होता. पुण्यात तो कशी कामगिरी करतो याकडे लक्ष राहणार आहे.





