Ravi Shastri : रिंकू-यशस्वी नव्हे तर ‘हा’ खेळाडू आहे भारताचा उदयोन्मुख तारा, रवी शास्त्रींचे वक्तव्य

Ravi Shastri praises Shubman Gill : इंग्लंड दौऱ्यावर नुकत्याच झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेट संघाने शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली शानदार कामगिरी केली. शेवटचा ओव्हल कसोटी सामना केवळ 6 धावांनी जिंकत भारताने मालिका 2-2 अशी बरोबरीत राखली. ही मालिका भारतीय संघासाठी अविस्मरणीय ठरली असून, सर्व खेळाडूंनी मालिका बरोबरीत राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याच दरम्यान, भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय क्रिकेटचा उदयोन्मुख तारा कोण आहे? याचा खुलासा केला.
कोण आहे भारताचा उदयोन्मुख तारा?
स्काय स्पोर्ट्स क्रिकेटवर बोलताना रवी शास्त्री यांना भारतीय क्रिकेटचा उदयोन्मुख तारा कोण आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ठामपणे सांगितले, “शुबमन गिलशिवाय दुसरे कोणी नाही. तो दीर्घकाळ संघात टिकेल, कारण आपण पाहिलं आहे की त्याने या मालिकेत कशी कामगिरी केली. मला वाटतं, तो अवघ्या 25 वर्षांचा आहे आणि या अनुभवासह तो आणखी उत्तम खेळाडू होईल.”
रवी शास्त्री पुढे म्हणाले, “तो आता इथेच आहे आणि यापुढेही राहील. तो शांत आणि रुबाबदार आहे. त्याच्यात ती खास गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही त्याला पाहता, तेव्हा त्याच्यातील खासियत दिसते. त्याची फलंदाजी अतिशय सहज आणि प्रवाही आहे. त्याच्याकडे मोठी खेळी करण्याची क्षमता आहे.”
हेही वाचा – Gautam Gambhir : गौतम गंभीरने कुटुंबासह महाकालेश्वर मंदिरात केली भस्म आरती, पाहा VIDEO
शुबमन गिलसाठी 2025 ठरलं खास –
शुबमन गिलने 2025 मध्ये आतापर्यंत 14 सामन्यांतील 20 डावांमध्ये 64.94 च्या सरासरीने 1234 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 6 शतके आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत. या वर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यापुढे फक्त इंग्लंडचा बेन डकेट आहे, ज्याने 1290 धावा केल्या. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत गिलने सर्वाधिक 754 धावा केल्या होत्या. त्याच्या या दमदार कामगिरीने भारतीय क्रिकेटच्या भविष्याला नवी दिशा मिळाली आहे





