Gautam Gambhir : गौतम गंभीरने कुटुंबासह महाकालेश्वर मंदिरात केली भस्म आरती, पाहा VIDEO

Gautam Gambhir Visits Mahakaleshwar Temple : यंदा यूएईमध्ये 9 सप्टेंबरपासून आशिया कप 2025 ची सुरुवात होणार आहे, तर अंतिम सामना 28 सप्टेंबरला खेळवला जाईल. या मोठ्या स्पर्धेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना शुक्रवारी, 15 ऑगस्ट रोजी उज्जैन येथील श्री महाकालेश्वर ज्योतर्लिंग मंदिरात भस्म आरती करताना पाहण्यात आले. गंभीर एकटे नव्हते, तर ते आपल्या संपूर्ण कुटुंबासह महाकाल दर्शनासाठी आले होते. त्यांच्या भस्म आरतीचा व्हिडिओही समोर आला आहे.
गौतम गंभीर काय म्हणाले?
भस्म आरतीनंतर गौतम गंभीर यांनी एएनआयशी बोलताना सांगितले, “मी येथे तिसऱ्यांदा आलो आहे आणि आज माझे कुटुंबही माझ्यासोबत आहे. भगवंताची कृपा संपूर्ण देशावर राहो.” आशिया कपबाबत बोलायचे झाले, तर भारतीय संघ आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध खेळेल, त्यानंतर 14 सप्टेंबरला पाकिस्तानशी सामना होईल. 19 सप्टेंबरला भारत ओमानशी दोन हात करेल.
गंभीरच्या नेतृत्वाखाली टी-20 मध्ये भारताची शानदार कामगिरी –
Gambhir attends Bhasma Aarti at Shri Mahakaleshwar Jyotirlinga Temple 🙏 pic.twitter.com/riEwpRgtqv
— Manmohan (@GarhManmohan) August 15, 2025
गौतम गंभीर यांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून टी-20 मध्ये भारताची कामगिरी उल्लंखनीय राहिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने आतापर्यंत 15 टी-20 सामने खेळले, त्यापैकी 12 मध्ये विजय मिळवला. केवळ 2 सामने गमावले, तर 1 सामना टाय झाला. गंभीर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या घरच्या मैदानावर टी-20 मालिका जिंकल्या, तर बांगलादेश आणि इंग्लंड यांना भारतात पराभूत केले.
हेही वाचा – Saliya Saman Ban : ICC ने श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटूवर घातली ५ वर्षांची बंदी! काय आहे प्रकरण? जाणून घ्या
19 ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता –
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा 19 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार यादव याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया कपमध्ये खेळण्याची दाट शक्यता आहे.





