Ravi Shankar Prasad : बिहारमधून गुड न्यूज मिळण्याची भाजपला प्रतीक्षा आहे, असे सूचक वक्तव्य त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी सोमवारी केले. त्यामुळे त्या राज्यात लवकरच भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार स्थापन होण्याचे संकेत मिळत आहेत. बिहारमधील एनडीए सरकारची धुरा मुख्यमंत्री म्हणून जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार सांभाळत आहेत. त्यांची नुकतीच खासदार म्हणून राज्यसभेवर निवड झाली. त्यामुळे त्यांचे राष्ट्रीय राजकारणात (Ravi Shankar Prasad) सक्रिय होणे निश्चित झाले. राज्यसभा सदस्य बनल्याने ७५ वर्षीय नितीश लवकरच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील. येत्या काही दिवसांत त्या घडामोडीची शक्यता आहे. Ravi Shankar Prasad त्या पार्श्वभूमीवर, प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी पत्रकारांशी बोलताना महत्वाचे वक्तव्य केले. भाजपने स्थापनेनंतर १९८४ यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत केवळ २ जागा जिंकल्या. त्यानंतर पक्षाने मोठी मजल मारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आणखीच बळकट होत आहे. आता बिहारमधून चांगली बातमी येण्याकडे आमचे लक्ष आहे, असे ते म्हणाले. त्यातून भाजपच्या गोटात बिहारमधील आगामी राजकीय घडामोडींविषयी उत्साहाचे वातावरण असल्याचे सूचित होत आहे. नितीश मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर त्या राज्यात नवे सरकार स्थापन होईल. त्या सरकारची सुत्रे जेडीयूचा मित्रपक्ष भाजपकडे जातील. म्हणजेच, नितीश यांची जागा भाजपचा मुख्यमंत्री घेईल, असे राजकीय आडाखे बांधले जात आहेत.