‘रोहित-विराट सोबत…’, आशिया कपमधून बाहेर पडलेल्या खेळाडूने ‘BCCI’ शी घेतला पंगा, नेमकं काय म्हणाला?

रवी बिश्नोई नेमकं काय म्हणाला?
‘गेम चेंजर्स’ या पॉडकास्टमध्ये बोलताना रवी बिश्नोई म्हणाला, “विराट आणि रोहित यांची निवृत्ती माझ्यासाठी धक्का होती. कारण तुम्हाला असे खेळाडू मैदानावरूनच निवृत्त होताना पाहायला आवडते. हे दोघेही महान खेळाडू आहेत आणि त्यांनी भारतासाठी खूप काही केले आहे. माझ्या मते, त्यांच्यापर्यंत कोणीही पोहोचू शकत नाही.” बिश्नोईने पुढे सांगितले की, कदाचित भविष्यात असे घडेल. हे दोन्ही खेळाडू सध्या वनडे क्रिकेट खेळत आहेत आणि त्यांना वनडे क्रिकेटमधून सन्मानाने निरोप मिळेल, अशी आशा त्याने व्यक्त केली.
त्यांना चांगला निरोप मिळावा –
रवी बिश्नोई पुढे म्हणाला, “तुम्हाला वाटते की त्यांना चांगला निरोप मिळावा. कदाचित वनडे क्रिकेटमध्ये असे होईल. त्यांनी जेव्हा इच्छा असेल तेव्हाच निवृत्ती घ्यावी, कारण कोणीही तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्ही कधी निवृत्त व्हावे. त्यांचे कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्त होणे माझ्यासाठी खरोखर धक्कादायक होते. आता त्यांची जागा कोण घेईल, हे माहित नाही.”
आशिया कपसाठी बिश्नोईची निवड नाही –
विशेष म्हणजे, रवी बिश्नोईची आशिया कपसाठी भारतीय संघात निवड झालेली नाही. 24 वर्षीय या गोलंदाजाने टी-20 क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. त्याने 42 टी-20 सामन्यांत 61 विकेट्स घेतल्या असून त्याचा इकॉनॉमी रेट फक्त 7.3 आहे. त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन आहे 13 धावांत 4 विकेट्स आहे. बिश्नोई टी-20 क्रमवारीत अव्वल गोलंदाजही राहिला आहे. असे असूनही त्याला संघात स्थान मिळाले नाही. आता त्याने विराट आणि रोहित यांच्या निवृत्तीवर केलेल्या वक्तव्यातून बीसीसीआयवर अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.





