सह्याद्री कॉलनी मित्र मंडळ आयोजित नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा
Updated On:

आळंदी – येथील सह्याद्री कॉलनी, ताजणे मळा, चऱ्होली बु. यांचे वतीने शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रास दांडिया व गरबासह मंडळाकडून नऊ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच विजयादशमीला सायंकाळी सोने लुटण्याच्या कार्यक्रमातून सर्वांना दसऱ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान व देवीची सह्याद्री कॉलनीमध्ये मिरवणूक काढण्यात आली व शेवटी कुविचार, भ्रष्टाचाररुपी रावणाचे दहन करून कार्यक्रमाची सांगता झाली.
कॉलनीमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव व नवरात्र महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने कॉलनीतील सर्वांना एकत्रित जमा करून समाज बांधणीचा उद्देश साध्य झाल्याचा आनंद वाटला, असे येथील नागरिकांनी मत व्यक्त केले.





