“राऊत, नार्वेकरांनी बाजारू राजकारण आणले”; माजी राज्यमंत्री शिवतारे यांचा घणाघात

सासवड – राज्यसभा खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांनी हवेलीत पैसे घेतले आणि नगरपापालिका निवडणुकीत चुकीच्या माणसाला तिकीट दिले. बाजारू राजकरण कुणी आणले असेल तर त्यांनी आणले, अशी टीका माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने सात्विक राजकरण आले आहे, अशी सुस्तीसुमनेही त्यांनी उधळली.
सासवड येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात शिवतारे बोलत होते. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार गुलाबराव पाटील, उदय सामंत, तानाजी सावंत, शहाजी पाटील, भीमराव तापकीर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शरद सोनवणे, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, जिल्हा समन्वयक ऍड. गितांजली ढोणे, डॉ. ममता लांडे, दिलीप यादव, उमेश गायकवाड, मंदार गिरमे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे, रमेश इंगळे प्रशांत वांडेकर, सुरज जगताप, निलेश जगताप, भूषण ताकवले, माणिक निंबाळकर, आदी पदाधिकाऱ्यांसह हजारो शेतकरी बांधव महिला व युवावर्ग उपस्थित होते.
विजय शिवतारे म्हणाले की, पुरंदर-हवेली मतदारसंघात मी ज्यावेळी एन्ट्री केली त्यावेळी एकही ग्रामपंचायत सदस्य नव्हता, सरपंच नव्हता. आता 70 ते 80 टक्के शिवसेनेचे सदस्य सेनेचे आहेत. 50 वर्षे शरद पवारांनी या पुरंदरला काही दिले नाही. पाणी दिले म्हणालेत मग काय उपकार केलेत, असा सवाल त्यांनी केला आहे. तर शरद पवारांनी तुम्ही काही दिले नाही; मात्र आम्ही दिले ते तरी कुणाच्या तोंडून घास काढून घेऊ नका, तुम्हाला देव सुद्धा माफ करणार नाही, अशी टीका त्यांनी केली.
आमच्या आमदारांना सर्व ठिकाणी अपशद्ब बोलले जातात. एकनाथ शिंदेंनी आमदारांना नाहीतर तर आमदारांनी एकनाथ शिंदेंना नेले होते, असा दावा शिवतारेंनी यावेळी केला. सर्वच जण बोलत होते, मात्र लक्ष दिले गेले नाही. मी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन सांगितले उद्धव ठारेंना सांगितले कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडा, मात्र काहीही झाले नाही. आज कुणाला रेडा म्हणतात, कुणाला काय म्हणतात, अशी टीका त्यांनी केली.
संजय जगताप अपघाताने आमदार
अपघाताने संजय जगताप आमदार झाले आहेत. पहिल्या कॅबिनेटमध्ये 4 टीएमसी पाणी अजित पवारांनी बारामतीला नेले. तेव्हा आमदार जगताप एक शब्दही बोलला नाही, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. अजित पवार यांनी राष्ट्रीय बाजार यशवंत कारखन्याकडे वळवला. पुरंदरच्या शेतकऱ्यांसाठी हा बाजार महत्त्वाचा होता, त्यावेळी का आम्हाला बोलवले नाही, असा सवाल शिवतारे यांनी उपस्थितीत केला.





