Earthquake News : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात भूकंपाचा धक्का; लोक घराबाहेर पळाले
Earthquake News : रत्नागिरी शहरापासून १० किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे समोर आले आहे.

Earthquake News : रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. सकाळी ८ वाजून १९ मिनिटांनी हा भूकंपाचा हादरा जाणवल्याने काही काळ नागरिकांमध्ये घबराट पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.८ इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्र रत्नागिरी शहरापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती समोर आली आहे.
हादरा जाणवल्यानंतर घाबरलेल्या नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. मात्र या घटनेत कोणतीही जिवीतहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
भूकंपानंतर प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार रत्नागिरीसह कोकणातील काही भाग भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील मानल्या जाणाऱ्या झोन ३ आणि झोन ४ मध्ये येतात. त्यामुळे अशा सौम्य धक्क्यांची नोंद अधूनमधून होत असते.





