Ratan Tata: रतन टाटा यांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत पोहोचले, थोड्याच वेळात अंत्यसंस्कार, मोठी गर्दी..

Ratan Tata Passed Away: रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील एनसीपीए ग्राऊंडपासून सुरू झालेला त्यांचा शेवटचा प्रवास वरळीच्या स्मशानभूमीत पोहोचला. रतन टाटा यांच्या पार्थिवावर लवकरच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
#WATCH | Union Home Minister Amit Shah, Union Minister Piyush Goyal, Maharashtra CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis, Gujarat CM Bhupendra Patel and other leaders present for the last rites of veteran industrialist Ratan Tata, in Mumbai.
His last rites will be carried… pic.twitter.com/lkchKuomaL
— ANI (@ANI) October 10, 2024
रतन टाटा यांची अखेरची यात्रा वरळीतील स्मशानभूमीत पोहोचली –
रतन टाटा यांची अखेरची यात्रा वरळीतील स्मशानभूमीत पोहोचली आहे. येथे पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे पार्थिव शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार वाहनातून काढून स्मशानभूमीत नेले.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Mortal remains of veteran industrialist Ratan Tata brought to Worli crematorium for his last rites, which will be carried out with full state honour. pic.twitter.com/8lB2F2AmFH
— ANI (@ANI) October 10, 2024
प्रार्थनेच्या खोलीत पार्थिव ठेवले –
रतन टाटा यांचे पार्थिव वरळीतील स्मशानभूमीत प्रार्थनागृहात ठेवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक राजकारणी आणि उद्योग आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती याठिकाणी उपस्थित आहेत.
अहनवेती पद्धतीने अंत्यसंस्कार –
रतन टाटा यांच्या पार्थिवावर पारशी प्रथेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव प्रथम वरळी येथील स्मशानभूमीत प्रार्थनागृहात ठेवण्यात येणार आहे. रतन टाटा यांच्या पार्थिवावर अहनवेती पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आधी गेह सारनू वाचले जाईल. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रतन टाटा यांचे पार्थिव तिरंग्याने लपेटले –
रतन टाटा यांच्या पार्थिवाला महाराष्ट्र पोलीस दलाच्या जवानांनी तिरंग्याने लपेटून मानवंदना दिली. त्यांचा शेवटचा प्रवास सुरू झाला आहे.





