भारताचा ‘रतन’ हरपला; शरद पवारांसह सुप्रिया सुळेंनी घेतले रतन टाटा यांचे अंत्यदर्शन

Ratan Tata Passes Away | देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.
मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि रात्री उशिरा त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने उद्योग जगतावर शोककळा पसरली आहे. राजकीय, सामाजिक तसेच उद्योग क्षेत्रातील अनेकांनी रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
रतन टाटा यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी एनसीपीएच्या लॉनमध्ये ठेवण्यात आले आहे. नुकतेच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी रतन टाटा यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
#WATCH | NCP-SCP chief Sharad Pawar and Supriya Sule pay last respects to Ratan Tata at NCPA grounds in Mumbai pic.twitter.com/euNCRNRLq1
— ANI (@ANI) October 10, 2024
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ”टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी टाटा उद्योगसमूहाची मूल्ये कायम राखली. त्यांच्या जाण्याने समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. माझे सासरे भालचंद्र सुळे आणि रतन टाटा यांनी अनेक संस्थांवर एकत्र काम केलं आहे. त्यामुळे रतन टाटा यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध होते,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, राज ठाकरे, शर्मिला ठाकरे यांनी देखील रतन टाटा यांचे अंत्यदर्शन घेतले.





