सचिन तेंडुलकरने रतन टाटांच्या निवासस्थानी जाऊन घेतले अंत्यदर्शन

Ratan Tata Passed Away | उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी बुधवारी रात्री (९ ऑक्टोबर) निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली असून उद्योग क्षेत्रासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्य सरकारने एक दिवसीय दुखवटा जाहिर केला असून मंत्रालयावरील तिरंगा झेंडा हा अर्धा उतरवण्यात आला आहे. तसेच सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
दरम्यान, रतन टाटा यांचे पार्थिव 10.30 वाजता एनसीपी येथे अंतिम दर्शनासाठी आणण्यात येणार आहे. यादरम्यान माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर रतन टाटा यांच्या निवसस्थानी दाखल झाला आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. Ratan Tata Passed Away |
#WATCH | Mumbai | Former Indian Cricketer Sachin Tendulkar arrives at Colaba residence of industrialist Ratan Tata to pay his last respects pic.twitter.com/xwpaDqHfO4
— ANI (@ANI) October 10, 2024
सचिन तेंडुलकरने ट्विट केले होते की, ‘रतन टाटा यांच्यासोबत वेळ घालवण्याचे भाग्य मला लाभले, पण लाखो लोकं जे त्यांना कधीच भेटले नाहीत, त्यांचे दु:ख आज मला समजते, असा त्यांचा प्रभाव आहे. प्राण्यांवरील प्रेमापासून ते परोपकारापर्यंत, त्यांनी दाखवून दिले की खरी प्रगती तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपण त्यांची काळजी घेतो. “Ratan Tata Passed Away |
In his life, and demise, Mr Ratan Tata has moved the nation.
I was fortunate to spend time with him, but millions, who have never met him, feel the same grief that I feel today. Such is his impact.
From his love for animals to philanthropy, he showed that true progress can… pic.twitter.com/SBc7cdWbGe
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 10, 2024
अमित शहा मुंबईत येणार
दरम्यान, रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबईत येणार आहेत. रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.





