Ratan Tata: रतन टाटांचे पार्थिव तिरंग्यात लपेटले, पोलिसांनी दिली मानवंदना, पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीकडे रवाना

Ratan Tata Passed Away: रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल जगभरातून शोक संदेश येत आहेत. देशातील सर्वच क्षेत्रातील लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
रतन टाटा यांचे पार्थिव तिरंग्याने मढवले, अखेरचा प्रवास सुरू –
रतन टाटा यांच्या पार्थिवाला महाराष्ट्र पोलीस दलाच्या जवानांनी तिरंग्याने मढवून मानवंदना दिली. त्यांचा शेवटचा प्रवास सुरू झाला आहे.
#WATCH | Mortal remains of Industrialist Ratan Tata being taken for last rites from NCPA lawns, in Mumbai
The last rites will be held at Worli crematorium. pic.twitter.com/Cs2xjeZBDi
— ANI (@ANI) October 10, 2024
वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार –
मुंबईतील एनसीपीए मैदानावर रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत नेण्यात येत आहे.
गुजरातमध्ये आज शोकदिन –
महाराष्ट्रानंतर गुजरात सरकारने रतन टाटा यांच्या स्मरणार्थ एक दिवसाचा शोक जाहीर केला आहे. गुजरात सरकारच्या म्हणण्यानुसार, शोकदिनी राष्ट्रध्वज अर्ध्यावर राहील आणि सरकारकडून कोणताही सांस्कृतिक किंवा मनोरंजन कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही.
पारशी प्रथेनुसार अंत्यसंस्कार –
रतन टाटा यांच्या पार्थिवावर पारशी प्रथेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव प्रथम वरळी येथील स्मशानभूमीत प्रार्थनागृहात ठेवण्यात येणार आहे. त्यात 200 लोक उपस्थित राहू शकतील. रतन टाटा यांच्या पार्थिवावर अहनवेती पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याआधी गेह सारनू वाचले जाईल. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

