Ratan Tata: रतन टाटा यांची प्रकृती गंभीर; आयसीयूमध्ये दाखल

Ratan Tata in critical condition: टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आज ९ ऑक्टोबरला रतन टाटा यांना मुंबईतील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सने दोन सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. तथापि, 86 वर्षीय टाटा यांनी गेल्या सोमवारी सांगितले होते की, काळजी करण्यासारखे काही नाही. दरम्यान, बुधवारी रतन टाटा यांच्या प्रकृतीबद्दल माहितीसाठी टाटा प्रतिनिधीना केलेल्या विनंतीला अद्याप त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यांचे उत्तर आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.
Thank you for thinking of me 🤍 pic.twitter.com/MICi6zVH99
— Ratan N. Tata (@RNTata2000) October 7, 2024
दरम्यान, रतन टाटा यांनी सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका ट्विटमध्ये सांगितले होते की, त्यांचे वय आणि संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.





