पुणे, कोंढवा: रसिकलाल एम. धारीवाल इंग्रजी शाळा, कोंढवा या विद्यालयाने यंदाच्या इयत्ता १०वी (SSC) बोर्ड परीक्षेत १००% निकाल प्राप्त करत आपल्या शैक्षणिक गुणवत्ता आणि शिस्तीची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे. विद्यार्थ्यांची चिकाटी, शिक्षकांचे परिश्रम आणि पालकांचे मोलाचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाले आहे. परीक्षेत ९०% पेक्षा अधिक गुण १३ विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. प्रथम ३ यशस्वी विद्यार्थी: १ मिश्रा मानसी अभिषेक – ९६.८०% १ खटावकर आर्या मयूर – ९६.८०% २ जाधव प्रथमेश आनंद – ९५.४०% ३ चौधरी विनिता – ९५.२०% विशेष उल्लेखनीय यश: मिश्रा मानसी, अभिषेक आणि जाधव प्रथमेश, आनंद यांनी गणित व विज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून आपल्या अभ्यासू वृत्तीचा उत्कृष्ट नमुना सादर केला आहे. तसेच, इयत्ता १२वी (विज्ञान आणि वाणिज्य शाखा) परीक्षेतही आर.एम.डी. विद्यालयाचा १००% निकाल लागलेला असून, सायन्स विभागात प्रथम वाघमारे वेदांत नितीन (८६.३३%) तर कॉमर्स विभागात मालविय गौरव प्रकाश (८३.६७%) प्रथम क्रमांक पटकवला. मालविय गौरव प्रकाश यास बुक किंपीग अँड अकाउंट विषयात १०० पैकी ९९ गुण मिळाले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे संस्थेच्या चेअरमन शोभा धारिवाल, अध्यक्ष पोपटलालजी ओस्तवाल तसेच सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका आणि उपमुख्याध्यापिका यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. ही यशोगाथा भावी पिढीसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी बळकटी देईल, असा विश्वास विद्यालयातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.