Rashmika Mandanna – साऊथची स्टार रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) ‘नॅशनल क्रश’ आहे. ‘पुष्पा : द राइज’नंतर रश्मिका घराघरात प्रसिद्ध झाली. चित्रपट हिट झाल्यानंतर रश्मिकाची (Rashmika Mandanna) फॅन फॉलोइंग ज्या वेगाने वाढली आहे, ते खरोखरच आश्चर्यकारक आहे. तसं पाहिलं तर रश्मिकाचे जितके चाहते वाढले आहेत तितकेच द्वेष करणारेही उघड्यावर आले आहेत.
दरम्यान, अश्यातच अभिनेत्रीचा एक फेक व्हिडिओ व्हायरल (Deepfake Video) करण्यात आला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे. तथापि, चेहरा रश्मिकासारखा दिसतो अशा प्रकारे मॉर्फ आणि एडिट केला गेला आहे. ज्यामुळे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
🚨 There is an urgent need for a legal and regulatory framework to deal with deepfake in India.
You might have seen this viral video of actress Rashmika Mandanna on Instagram. But wait, this is a deepfake video of Zara Patel.
This thread contains the actual video. (1/3) pic.twitter.com/SidP1Xa4sT
— Abhishek (@AbhishekSay) November 5, 2023
दरम्यान, हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की तो थेट महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या पर्यंत पोहोचला आहे. त्यांनी देखील या व्हिडिओवर आक्षेप घेत कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. बच्चन यांनी व्हिडिओ रिट्विट करत होय, “ही कायदेशीर केस असल्याचे सांगितले’. तर, दुसरीकडे स्वतः अभिनेत्री रश्मिकाने तिच्या या फेक व्हिडिओवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
‘ऑल्ट न्यूज’च्या अभिषेक यांनी रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ (deepfake video) व्हायरल होऊ लागल्यानंतर ट्विट करत हा व्हिडिओ ट्विट करत प्रकरणाचा वाचा फोडली. त्यांनी हा मूळ व्हिडिओ झारा पटेल या ब्रिटीश-भारतीय असलेल्या महिलेचा आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर 415K फॉलोअर्स आहेत. 9 ऑक्टोबर रोजी तिने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. हाच व्हिडिओ डीपफेक करण्यात आला.