Rashmika Mandanna : साऊथ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे एकमेकांचं कौतुक करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. सध्या त्यांच्या लग्नाच्या चर्चा जोरात सुरू असताना रश्मिकाने विजयला स्वतःसाठी एक “आशीर्वाद” म्हटलं आहे. रश्मिकाचं विजयबद्दल प्रेमळ वक्तव्य हैदराबादमध्ये झालेल्या तिच्या ‘द गर्लफ्रेंड’ या चित्रपटाच्या यश समारंभात रश्मिका विजयबद्दल मनापासून बोलली. कार्यक्रमात विजय देवरकोंडा देखील उपस्थित होता, आणि त्या दोघांमधला एक गोड क्षणही पाहायला मिळाला. त्यानंतरच्या भाषणात रश्मिकाने सांगितलं, “विजू, तुम्ही सुरुवातीपासूनच या चित्रपटाचा भाग आहात आणि त्याच्या यशात तुमचाही मोठा वाटा आहे. ही संपूर्ण प्रवासकथा तुमच्यामुळे खास झाली. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात एक विजय देवरकोंडा असावा, कारण तो खरोखरच एक आशीर्वाद आहे.”रश्मिका हे बोलताच प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा आणि आनंदाचा गडगडाट झाला. त्या कार्यक्रमात विजयनेही रश्मिकाचं कौतुक केलं, “रश्मिका, मला तुझा अभिमान आहे. तू तुझ्या करिअरच्या सर्वोच्च टप्प्यावर असताना अशी कथा निवडलीस जी सांगणं तुझ्यासाठी महत्त्वाचं होतं. तुला प्रेक्षक किती येतील याचं भान नव्हतं, पण तुला ही गोष्ट सांगायची होती. तुझ्या मेहनतीसाठी, तुझ्या प्रवासासाठी आणि तू जशी आहेस त्यासाठी मला तुझा खूप अभिमान आहे.” लग्नाच्या चर्चांबद्दल काय खरं? गेल्या महिन्यात अशी चर्चा होती की रश्मिका आणि विजय यांची साखरपुडा सोहळा पार पडला आहे. मात्र दोघांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. अलीकडच्या काही बातम्यांनुसार, दोघांचं लग्न 26 फेब्रुवारी 2026 रोजी उदयपुरमध्ये होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तरीसुद्धा, विजय किंवा रश्मिका या दोघांकडूनही या बातमीवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.