अखेर नॅशनल क्रशचं ठरलं! रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाने गुपचूप उरकला साखरपुडा; लवकरच लग्नाचीही होणार घोषणा

Vijay Rashmika’s engagement : नॅशनल क्रश रश्मिका मंदाना हिचं अखेर ठरलं असल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून साऊथ आणि बॅालिवूड सिनेमा इंडस्ट्रीत रश्मिका मंदाना आणि प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या एकमेकांना डेटिंग करत असल्याच्या बातम्या समोर येत होती.
अखेर दोघांनीही गुपचूप साखरपुडा उरकत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित दोघांचा साखरपुडा झाला आहे. ‘गीता गोविंदम’ या सिनेमातून रश्मिका आणि विजय यांच्या जोडीला चाहत्यांनी मोठी पसंती दर्शवली होती. तेव्हापासून दोघेही एकमेकांना डेट करत होते. अनेकवेळा दोघेही एकत्रित स्पॅाट झाले. त्यामुळे चाहत्यांना दोघेही रियल लाइफमध्ये जोडीदार व्हावे, अशी इच्छा होती.
अखेर त्यांचा साखरपुडा झाला असून लवकरच लग्नाबाबतीची घोषणा करण्यात येणार आहे. त्यांच लग्न २०२६ मध्ये फ्रेब्रुवारी महिन्यात होणार असल्याची माहिती आहे. याबबतची वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. रश्मिकाने अलिकडेच साडी नेसून काही फोटो इंन्स्टाग्रामवरून शेअर केले होते. अभिनेत्रीने तिच्या साखरपुड्यासाठी ही साडी नेसल्याचीही चर्चा झाली. त्यांच्या साखरपुड्याचे वृत्त आल्यानंतर आता चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मात्र, साखरपुडा झाला असल्याची अधिकृत घोषणा दोघांकडूनही करण्यात आलेली नाही.
रश्मिका आणि विजय हे दोघेही सिनेमा इंडस्ट्रीतील प्रभावित चेहऱ्यांपैकी एक एक आहेत. त्यांच्या सिनेमांची जादू चाहत्यांवर आहे. चाहते नेहमी त्यांच्या आगामी सिनेमाची वाट पाहत असतात. सध्या रश्मिका तिच्या ‘थामा’ सिनेमामुळे चर्चेत आहे. याआधी तिने ‘छावा’ सिनेमात केलेल्या अभिनयामुळे प्रेक्षकांची पसंती मिळवली. विजय अलिकडेच गौतम तिन्नानुरी यांच्या तेलुगू स्पाय अॅक्शन-थ्रिलर सिनेमा ‘किंगडम’मध्ये झळकला होता. त्याच्याकडे देखील आगामी मोठे प्रोजेक्ट आहेत.
हेही वाचा : Pimpri News : गांधी विचारांचा जागर! मदरशात अनाथ मुलांनी घेतली अहिंसेची शपथ





