रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क ; म्हणाले, मी चार लाख मतांनी…”

Raosaheb Danve । लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आज महाराष्ट्रासह देशभरात पार पडत आहे. त्या टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९६ जागांसाठी आज मतदान होत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ११ जागांचाही समावेश आहे. यामध्ये जालना लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. त्यातच जालन्याचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.
जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी भोकरदन येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर कुटुंबासमवेत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी माध्यमांना बोलताना, “मी चार लाख मतापेक्षा जास्त मतांनी निवडून येणार आहे. देशभरामध्ये आमच्या ४०० पेक्षा जास्त जागा निवडून येणार आहेत. तसंच महाराष्ट्रामध्ये काही भागात उष्णतेमुळे मतदान जरी कमी झाले असले मात्र आज उष्णता कमी असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून आपला लोकशाहीचा हक्क बजावावा अशी प्रतिक्रिया यावेळी महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.
यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी निर्मला दानवे, आमदार संतोष पाटील दानवे, सून रेणू दानवे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील पुणे, शिरूर, मावळ, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर आणि जालना मतदारसंघांमधील मतदार त्यांचा हक्क बजावतील. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात २९८ उमेदवारांचे भवितव्य ठरेल.
हे वाचलं का
महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी बजावला मतदानाचा अधिकार
भाजप उमेदवार माधवी लता यांनी हैदराबादमध्ये केले ‘मतदान’
10 राज्यातील 96 जागांसाठी आज मतदान ; अखिलेश,ओवेसीसह 1717 उमेदवार रिंगणात
अभिनेता ज्युनियर एनटीआरने बजावला मतदानाचा हक्क
निलेश लंकेंनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले “ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती”
चौथ्या टप्प्याचे मदतदन सुरु ; पंतप्रधान मोदी म्हणाले,”….लोकशाही बळकट करूया!…”





