Ranveer Allahbadia : “पॉडकास्ट सुरू करता येणार, पण….”; रणवीर अलाहबादियाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

Ranveer Allahbadia : युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना चांगलंच फटकारले आहे. न्यायालयाने रणवीरला अटकेपासून दिलासा दिला आहे. मात्र दिलासा देत असताना न्यायालयाने अलाहाबादियाला चांगलेच झापले आहे.
युट्यूब शो इंडियाज गॉट लेटेंटमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पॉडकास्टर रणवीर अलाहबादियावर गुन्हा दाखल झाला होता. त्याच्याविरोधात अनेक याचिकाही दाखल झाल्या आहेत. या याचिकांविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून आज याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
समर रैनाच्या युट्यूब शोवर अलाहबादियाने आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याचं पॉडकास्ट प्रसारित करणं बंद करायला सांगितलं होतं. मात्र, आता रणवीर अलाहाबादियाला दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने रणवीरला सोशल मीडियावर त्याचं पॉडकास्ट आणि शो अपलोड करायला परवानगी दिलीय.
रणवीर अलाहबादियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याने मागणी केली होती की, पॉडकास्ट हे माझ्या उदरनिर्वाहाचा एकमेव स्रोत आहे ते पुन्हा प्रसारित करण्याची परवानगी मिळावी. रणवीरने इंडियाज गॉट लॅटंट शोवर आक्षेपार्ह विधान केलं होतं. यामुळे अलाहबादियाविरोधात अनेक एफआयआर दाखल झाल्या आहेत.
दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, मूलभूत अधिकार हे अनिर्बंध नाहीत, त्यावर काही मर्यादा आहेत. पॉडकास्ट सादर करताना नैतिकता, सभ्यता आणि शालीनतेचे पालन केले, जेणेकरून कोणत्याही वयोगटातील प्रेक्षक हा ‘शो’ पाहू शकतील, असे हमीपत्र याचिकाकर्ता देत असेल तर त्यांना शो पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी देता येईल.
तसेच, शो प्रदर्शित करण्यासाठी काही नियमांची पूर्तता करणे आवश्यक आहे. ‘शो’मध्ये सभ्यतेचे नियम पाळले जावेत. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला याबाबत काही नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले. जे संविधानाच्या कलम १९ (४) अन्वये देण्यात आलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराला बाधा आणणार नाहीत.
कोण आहे रणवीर अलाहाबादिया?
– रणवीर अलाहाबादिया हा देशातील एक प्रसिद्ध सोशल मीडिया इंफ्लूएंसर, YouTuber आणि कंटेंट क्रिएटर आहे. त्याचा पॉडकास्ट शो बिअरबिसेप्स या नावाने प्रसिद्ध आहे.
– रणवीर अल्लाबदियाचे यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलही बिअरबाइसेप्सच्या नावावर आहे. त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचे 3 मिलियन फॉलोअर्स आहेत. यूट्यूब चॅनलवर 7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
– त्याने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची पॉडकास्ट मुलाखतही घेतली आहे. याशिवाय त्याने करीना कपूर, यामी गौतम, मृणाल ठाकूर, विकी कौशल यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्ससोबत पॉडकास्ट मुलाखतीचे व्हिडिओ देखील बनवले आहेत.
– रणवीर अलाहबादिया त्याच्या यूट्यूब चॅनेल BearBiceps आणि ‘The Ranver Show’ द्वारे पॉडकास्ट होस्ट करतो. रणवीर अलाहाबादिया देखील एक बिझनेसमन आहे. रणवीर हा मुंबईतील अलाहाबादियाचा रहिवासी आहे, त्याचा जन्म 2 जून 1993 रोजी झाला.
– रणवीरने मुंबईच्या धीरूभाई अंबानी स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. रणवीरने मुंबईच्या द्वारकादास जे. येथून ग्रॅज्युएशन केले. संघवी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून पूर्ण केले.
– रणवीर हा BearBiceps Monk Entertainment चा सह-संस्थापक आहे. 2022 च्या फोर्ब्स 30 आशिया यादीत त्याचे नाव समाविष्ट करण्यात आले





