रानू मंडलने केला लता दीदींचा अपमान म्हणाली,’लता फटा…’ व्हिडिओ झाला व्हायरल

मुंबई – रेल्वे स्टेशनवर गाणे गाऊन रानू मंडल रातोरात प्रसिद्ध झाली, आणि त्यानंतर राणू मंडलचा व्हिडिओ व्हायरल झाला. राणूचा आवाज सर्वत्र खूप आवडला. यानंतर हिमेश रेशमियाने राणूला गाण्याची ऑफरही दिली. एकीकडे राणूचे नशीब चमकत होते तर दुसरीकडे स्वतःच्या वाईट वागणुकीमुळे तिने पायावर कुऱ्हाड मारली. तिच्यासोबत सर्वत्र वाईट गोष्टी घडू लागल्या, आणि हळूहळू ती पुन्हा विस्मृतीत गेली.
अशातच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्याबद्दल असे बोलले की आहे की ज्यामुळे, ‘जनतेसह सोशल मीडिया युजर्स भडकले आहे.’
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये रानू मंडल म्हणते, ‘ये जो गाना गा राही हु , ये तो कोई लता फटा का नहीं है. हे लताजींचे नाही. मी गायलेल्याचा आवाजही चांगला आहे. ते चांगले होते,’ त्यानंतर राणू 1977 मध्ये आलेल्या ‘हम किसी से कम नहीं’ या चित्रपटातील ‘है अगर दुश्मन’ गाणे म्हणू लागते. मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी ते गायले होते.
हा व्हिडिओ समोर येताच युजर्स राणू मंडलवर संतापले. दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचा अपमान केल्याबद्दल लोक राणूचा राग करत आहे. काही म्हणाले की,’लताजींचा आदर करायला शिका.” असे म्हटले आहे.





